March 21, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

सोमेश्वरवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त महाराजांच्या पुतळ्यास दुधाचा अभिषेक…

सोमेश्वरवाडी :

सोमेश्वरवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त सोमेश्वरवाडी ग्रामस्थ आणि सचिन दळवी सोशल फाउंडेशन च्या वतीने शिवरायांच्या पुतळ्यास दूध अभिषेक करून पुष्पहार अर्पण करून शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. तसेच शिवरायांची आरती करण्यात आली. शिव वंदना करून महाराजांना नमन करण्यात आले.

या प्रसंगी सचिन दळवी, शिवम सुतार, गोकुळ जाधव, तेजस बामगुडे, विष्णू काकडे, आनंद जाधव, स्वराज आरगडे,अनिकेत चव्हाण आणि ग्रामस्थ उपस्थित होते.