September 8, 2024

Samrajya Ladha

पाषाण येथे आज होणार समाजभूषण ह.भ.प. शांताराम(अण्णा) सयाजीबुवा निम्हण यांचा अमृत महोत्सवी सोहळा..

पाषाण :

पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी सह आसपासच्या बहुतांशी गावांमध्ये सांप्रदायिक क्षेत्रातील अतीशय महत्वाचे व आदरणीय असणारे नाव समाजभूषण ह.भ.प. शांताराम(अण्णा) सयाजीबुवा निम्हण यांचा अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा सर्व ग्रामस्थांनी एकत्र येत आज रविवार दिनांक ११ फेब्रुवारी २०२४ रोजी आयोजित केला आहे.

 

पाषाण येथील ज्ञानदीप मंगल कार्यालय, सूसरोड, पाषाण, येथे रविवार दि. ११ फेब्रुवारी २०२४ रोजी सायं. ६.०० वा मुख्य अभिष्टचिंतन सोहळा होणार असून दिवसभर विविध सामाजिक उपक्रम यानिमित्त आयोजित करण्यात आले आहे. मुख्य समारंभाचे अध्यक्ष म्हणुन माजी खा. विदुराजी उर्फ नानासाहेब नवले उपस्थित राहणार आहेत तर ह.भ.प. केशव महाराज नामदास (नामदेव महाराजांचे वंशज), ह.भ.प. गोपाळ महाराज गोविंद गोसावी (विश्वस्त सोपानदेव समाधी संस्था सासवड), ह.भ.प. बाळासाहेब महाराज देहुकर (जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे वंशज), संतवीर ह.भ.प. बंडातात्या कराडकर, मा. उल्हासदादा पवार व ह.भ.प. प्रमोद महाराज जगताप (अण्णा) यांच्या उपस्थितीमध्ये अमृतमहोत्सव सोहळा तसेच आण्णांच्या कारकिर्दितील सामाजिक व वारकरी सांप्रदायिक कार्याचा आढावा घेणाऱ्या “सभाव भजन” गौरव ग्रंथाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

समाजभूषण ह.भ.प. शांताराम सयाजीबुवा निम्हण (अण्णा) यांनी हा अमृत महोत्सव सोहळा सामाजिक उपक्रम राबवत साजरा करावा अशी भावना व्यक्त केली म्हनून “समाजभूषण ह.भ.प. शांताराम सावजीबुवा निम्हण ट्रस्ट” तयार करुन सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहेत. या अंतर्गतच रविवार कि. ४ फेब्रुवारी २०२४ रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. आज मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. वारकरी व सामाजिक क्षेत्रातील सर्व मान्यवर तसेच अण्णांप्रती स्नेह व श्रद्धा असणारे सर्वजणांनी ज्ञानदीप मंगल कार्यालय, सरोड, पाषाण, पुणे 21 येथे उपस्थित राहण्याची आवाहन समस्थ ग्रामस्थ व भजनी मंडळ पाषाण, सुतारवाडी व सोमेश्वरवाडी यांनी केले आहे.