औंध, दिनांक २७ जुलै २०२५:
औंध येथील प्रतिष्ठित औंध व्यापारी असोसिएशनच्या अध्यक्षपदी श्री. नाना गोपीनाथ वाळके यांची एकमताने नियुक्ती करण्यात आली आहे. २७ जुलै २०२५ रोजी आयोजित विशेष बैठकीत सर्व पदाधिकारी आणि सदस्यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला.
श्री. नाना वाळके हे गेल्या अनेक वर्षांपासून व्यापारी वर्गाच्या समस्या सोडवण्यासाठी आणि व्यापाऱ्यांचे हक्क व हित जोपासण्यासाठी सक्रियपणे कार्यरत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या कामकाजात नव्या उत्साहाची आणि दिशा-दर्शक बदलाची अपेक्षा व्यक्त होत आहे.
या नियुक्तीनंतर श्री. नाना वाळके यांनी सांगितले की, “औंधमधील सर्व व्यापाऱ्यांचे प्रश्न, त्यांचे हक्क व सुरक्षितता यासाठी संघटना एकत्र येईल. संवाद आणि सामंजस्याच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाशी समन्वय साधत सकारात्मक बदल घडवू”. औंध व्यापारी असोसिएशनमार्फत लवकरच व्यापाऱ्यांसाठी विविध उपक्रम, कार्यशाळा व समस्या निवारण बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे.
यावेळी सचिन दिनकर निवंगुणे, सदस्य : राष्ट्रीय व्यापारी कौर कमीटी, संदीप राठोड, संतोष भाटेवरा, आशिष राठोड, मनीष सोनिगरा, सुरेश चौधरी, नितीन खोंड तसेच मोठ्या संख्येने व्यापारी उपस्थित होते




























More Stories
कोथरूड विधानसभा मधील पाषाण-सुतारवाडी लिंक रोड वरील कचऱ्यावरून राजकारण पेटले! अमोल बालवडकरांच्या इशाऱ्यानंतर प्रशासन खडबडून जागे; पण तत्परता फक्त ‘खास’ भागापुरतीच का?
सुस परिसर वाहतूक कोंडीबाबत अनिकेत चांदेरे यांच्याकडून वाहतूक पोलिसांना निवेदन
मैत्रीचा धागा, विश्वासाचे नाते! युवा स्पंदनतर्फे चतुःश्रुंगी व कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये फ्रेंडशिप डे उपक्रम