म्हाळुंगे :
आज म्हाळुंगे येथील गोदरेज क्लोव्ह सोसायटीमध्ये भाजप युवा मोर्चा पुणे शहरचे उपाध्यक्ष शिवम बालवडकर आणि भाजप सदस्य प्रियंका शिवम बालवडकर यांच्या वतीने आयोजित नागरिक सुविधा केंद्राला नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. नागरिकांना विविध सरकारी सेवा एकाच छताखाली उपलब्ध झाल्याने त्यांनी या सुविधेचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला.
या शिबिरात आधार कार्ड अपडेट, नवीन पॅनकार्ड, नवीन मतदान नोंदणी, रेशनकार्ड, मॅरेज सर्टिफिकेट, भाडेकरी करार, पासपोर्ट सुविधा, आणि रहिवासी दाखला अशा अनेक महत्त्वाच्या सेवा पुरवण्यात आल्या. या सुविधेमुळे नागरिकांना विविध सरकारी कामांसाठी वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये जाण्याचा वेळ आणि त्रास वाचला.
भाजप युवा मोर्चा पुणे शहरचे उपाध्यक्ष शिवम बालवडकर आणि भाजप सदस्य प्रियंका शिवम बालवडकर यांनी या नागरिक सुविधा केंद्राच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या प्रयत्नांमुळे सोसायटीमधील नागरिकांना आवश्यक त्या सेवा सहज उपलब्ध झाल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.


More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी