March 22, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सुतारवाडीत आरोग्य शिबिर आणि वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

सुतारवाडी :

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सुतारवाडी येथे आरोग्य शिबिर आणि वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शिवसेना शाखा सुतारवाडी, सनशाईन प्री-स्कूल, फकीरा फाउंडेशन, महेश भीमराव सुतार मित्रपरिवार आणि आय.आय.एम.एस. हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.

या आरोग्य शिबिरात लहान आणि मोठ्या अशा १०० ते ११० नागरिकांनी आणि मुलांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. यावेळी त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शिवदूत महेश सुतार यांच्यामार्फत वृक्षारोोप वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी शिवसेना (UBT) नेते बाळासाहेब देशमुख, अशोक दळवी, रामभाऊ निम्हण, शंकर सुतार, दशरथ खेडेकर, धर्मराज सुतार, अनिल नलावडे, अर्जुन पसाले (साम्राज्य लढा न्यूज पोर्टल), नारायण सुतार (मराठा सेवक), गणेश मोरे (मराठा सेवक), काँग्रेस (आय) चे दत्ताभाऊ जाधव (रेशनिंग कमिटी सदस्य), उपविभाग प्रमुख दिनेशनाथ, उपशहर संघटिका ज्योतीताई चांदेरे, विभाग संघटिका स्वातीताई रणपिसे, रूपालीताई सुतार, उपविभाग प्रमुख संदीप सातव, वंबआ रामभाऊ चव्हाण, गणेश लगड, प्रभाग प्रमुख ऋषिकेश कुलकर्णी, संदीप तात्या सुतार, प्रदीप तात्या सुतार, शाखाप्रमुख अमोल फाले, शाखा संघटक सुरज चोरमुले, सागर वहाळे, अक्षय फाले, योगेश खेडेकर, नकुल गोळे, हनुमंत दादा भिसे, सोमनाथ गुंडगळ, मनीष चक्रनारायण, योगेश रणपिसे, कुणाल गोळे, जीवन सुर्वे, प्रसाद दादा पवार, चैतन्य सुतार, ओमकार सुतार, विशाल मालपोटे, साहिल सुतार, आदेश सुतार, कुलदीप सुतार, रोहन गव्हाणे, वेदांत गव्हाणे, रोहित गव्हाणे, प्रथमेश रणपिसे, सार्थक रणपिसे, आदित्य साबळे, रोहन दादा कदम, तसेच सनशाईन प्री-स्कूलचे शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी आणि आयोजकांनी विशेष परिश्रम घेतले.