बाणेर :
अष्टगंधा-मित्रनगर कॉलनीतील रहिवाशांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी गणेश कळमकर यांनी आज (शुक्रवार, २७ जुलै २०२५) स्थानिक सभासदांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कॉलनीसमोरील मुख्य समस्या समजून घेतल्या आणि त्यांच्या निराकरणासाठी पुढील नियोजनाबाबत मार्गदर्शन केले.
चर्चेदरम्यान रहिवाशांनी प्रामुख्याने पार्किंग समस्या, नाल्यांची स्वच्छता आणि दुर्गंधी तसेच वाहतूक कोंडी (ट्रॅफिक) या प्रमुख अडचणी कळमकर यांच्यासमोर मांडल्या.
या महत्त्वपूर्ण बैठकीला पुणे
महानगरपालिकेच्या (पीएमसी) ड्रेनेज विभागाचे अभियंता अनिकेत शिंदे उपस्थित होते. तसेच, गणेश कळमकर यांनी पीएमसीचे अधिकारी आडे सर यांच्याशी फोनवरून संवाद साधत, या समस्यांची गांभीर्याने दखल घेण्याची विनंती केली.
कळमकर यांनी रहिवाशांना आश्वासन दिले की, या समस्यांवर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी संबंधित विभागांशी समन्वय साधला जाईल आणि योग्य उपाययोजना केल्या जातील.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी