October 29, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

“उत्सव नारीशक्तीचा पर्व – २” : पूनम विशाल विधाते यांच्या संकल्पनेतून मंगळागौर स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बाणेर :

वामा वुमन्स क्लबच्या अध्यक्षा तसेच राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी पुणे शहराच्या कार्याध्यक्ष सौ. पूनम विशाल विधाते यांच्या संकल्पनेतून आणि आयोजनातून “मंगळागौर स्पर्धा – उत्सव नारीशक्तीचा पर्व – २” या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. बाणेर, बालेवाडी, सुस व महाळुंगे परिसरातील महिलांनी या कार्यक्रमात मोठ्या उत्साहाने सहभाग घेत पारंपरिकतेचा वारसा जपला.

या स्पर्धेत पारंपरिक झिम्मा, फुगडी, पारंपरिक खेळ, गीतं आणि नृत्य सादर करून उपस्थित महिलांनी एक वेगळा उत्साह आणि सांस्कृतिक एकात्मतेचे दर्शन घडवले. महिलांच्या कलागुणांना वाव मिळवून देणारा आणि सामाजिक ऐक्य वाढवणारा असा हा कार्यक्रम ठरला.

कार्यक्रमाला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रूपालीताई चाकणकर आणि भोर-राजगड-मुळशी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार शंकरभाऊ मांडेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी अभिनेत्री अमृता सुभाष व अभिनेता प्रथमेश परब यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली.
तसेच उपस्थित मान्यवरांमध्ये माजी नगरसेवक प्रमोद अण्णा निम्हण, माजी नगरसेविका सुषमाताई निम्हण आणि सौ. ज्योतीताई राहुलदादा बालवडकर यांचा समावेश होता.

या कार्यक्रमात पुणेची सुकन्या कुमारी आरोही मंगेश चोंधे हिचा देखील विशेष सत्कार करण्यात आला.
तिने नुकत्याच दक्षिण कोरिया येथे पार पडलेल्या इंटरनॅशनल स्पोर्ट्स तायक्वांदो स्पर्धेत एक कास्य पदक व एक रौप्य पदक पटकावले असून तिचा सत्कार सौ. रूपालीताई चाकणकर यांच्या हस्ते सन्मानपूर्वक करण्यात आला.

रूपालीताई चाकणकर यांनी महिलांनी स्वतःचा व्यवसाय, उद्योग सुरू करून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, असे मार्गदर्शन केले. महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा कार्यक्रमांची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

आमदार शंकरभाऊ मांडेकर यांनी पूनम विधाते यांच्या सामाजिक कार्याची प्रशंसा करत, “महिलांसाठी पारंपरिक व सामाजिक कार्यक्रम आयोजित करून त्यांनी एक प्रेरणादायी उपक्रम राबवला आहे. त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीत मी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहीन,” असा विश्वास व्यक्त केला.

या कार्यक्रमात विजेते ठरलेले संघ पुढीलप्रमाणे :

प्रथम क्रमांक : राजमाता जिजाऊ ग्रुप, बाणेर

प्रथम क्रमांक : रणरागिनी ग्रुप

द्वितीय क्रमांक : स्नेहवर्धिनी मंगळागौर ग्रुप

द्वितीय क्रमांक : गौराईच्या लेखी

तृतीय क्रमांक : सद्गुरु महिला बचत गट

चतुर्थ क्रमांक : सप्तशृंगी ग्रुप

पाचवा क्रमांक : मैत्रीण ग्रुप, बाणेर

उत्तेजनार्थ क्रमांक : नक्षत्र मंगळागौर ग्रुप

सामाजिक विषयांवर उत्कृष्ट सादरीकरण केल्याबद्दल “सोळा मंगल दुर्गा ग्रुप” या वयाच्या ६० वर्षांवरील महिलांच्या समूहाचा विशेष सन्मान करण्यात आला.

श्रावण क्वीन या कार्यक्रमात

श्रावण क्वीन म्हणून अमृता कुलकर्णी

उत्कृष्ट वेशभूषा म्हणून मेधा साळुंखे यांची निवड करण्यात आली.

या कार्यक्रमास विविध वयोगटातील महिलांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला असून, वामा वुमन्स क्लबच्या माध्यमातून पुढील काळात अधिक उपक्रम राबवले जाणार असल्याचे सौ. पूनम विधाते यांनी सांगितले.

 

You may have missed