October 28, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

पाषाण बाणेर परीसरातील पतसंस्थांची कामे चांगली : सुनील चांदेरे

बाणेर :

पाषाण बाणेर परीसरातील पतसंस्थानी चांगले काम केले. अडचणीच्या काळात नागरिकांना मदत केली. त्यामुळे अनेक कुटुंबे आर्थिक दृष्ट्या सक्षम झाली. या पतसंस्थानी भक्कम आधार दिल्यानेच हे सर्व घडले. म्हणूनच लोकांच्या जीवनातील आर्थिक विघ्ने दूर करणारी विघ्नहर्ता पतसंस्था कौतुकास पात्र असल्याचे प्रतिपादन पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे यांनी केले. ते विघ्नहर्ता नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ कार्यक्रमातील प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

चांदेरे पुढे म्हणाले की योगिराज, बाणेर नागरी, दत्तकृपा , शिवराय या सर्व पतसंस्थांनी हातात हात घालुन सहकार चळवळ पुढे नेत सर्वसामान्यांना मदतीचा हात दिला आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने या सर्व संस्थांना पाठबळ दिले जाईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी पतसंस्थेच्या सभासदांना १० टक्के लाभांश वाटण्यात आला. चांगले काम करणाऱ्या सेवकांचा सन्मान करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेच्या चेअरमन विधाते होत्या .

याप्रसंगी चेअरमन भारती विधाते , व्हा.चेअरमन – श्री. प्रकाश गायकवाड,सेक्रेटरी मनिषा कदम,संचालक तुकाराम ठोंबरे ,रामदास कुदळे,कीशोर जाधव,प्रकाश दर्शने,हिराबाई बामगुडे,सुनील चासकर ,रोहिदास कोकाटे ,नरेंद्र कुलकर्णी,व्यवस्थापक सुधाकर मोरे ,वसुली अधिकारी,संभाजी उर्फ गणेश कदम ,माजी चेअरमन राजाभाऊ सुतार ,ऑडिटर विजय वाणी ,खेमराज रणपिसे ,दिलीप रणपिसे , संस्थेचे सभासद,विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

You may have missed