सुसगाव:
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सुसगावात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिवसैनिक डॉ. दिलीप मुरकुटे पाटील यांनी महाराष्ट्र भूषण, समाज प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्या कीर्तनाचे आयोजन केले होते, ज्याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना, बाणेर नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसैनिक डॉ. दिलीप मुरकुटे पाटील यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, राम गायकवाड शाखाध्यक्ष बाणेर नागरी पथसंस्था पिरंगुट, रखमाजी पाडाळे, ॲड विशाल पवार, ॲड सौरभ गोळे, शिवसेना शाखाप्रमुख वसंत चांदेरे, सोमनाथ कोळेकर, माजी सरपंच नामदेव चांदेरे, जालिंदर चांदेरे, विष्णू फणसे, नंदकुमार फणसे, सचिन भोते, बद्रीनाथ भोते, मृदंगमनी सुरज फणसे, भैरवनाथ भजनी मंडळ सुसगाव, अविनाश गायकवाड, ऋषिकेश लोढे, जीवन खेडेकर, सुमित कांबळे, शिवकुमार नाईकवाडे, सुसगाव ग्रामस्थ, महिला भजनी मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी