औंध ता. २९ (प्रतिनिधि) :
औंध, औंधरोड, बोपोडी, खडकी परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. यामुळे वाहतूक कोंडी, अपघात होत आहेत. याबाबत निवेदन देऊनही औंध, बाणेर क्षेत्रीय कार्यालयामार्फत कार्यवाही होत नसल्यामुळे, रस्त्यावरील खड्ड्यांमध्येच राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे वृक्षारोपण करण्यात येणार आहे. १ ऑगस्ट रोजी हे आंदोलन करणार असल्याचे राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस, प्रवक्ता सुनील माने यांनी सांगितले. याबाबत त्यांनी औंध, बाणेर क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त गिरीश दापकेकर यांना ही पत्र देऊन त्यांनाच वृक्षारोपण आंदोलनास उपस्थित राहण्याची विनंती केली आहे.
त्यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, औंध, बोपोडी, खडकी परिसरात मोठ्या प्रमाणात रस्त्यावर खड्डे पडले आहेत. या खड्डे युक्त रस्त्यांमुळे या भागात वारंवार अपघात होत आहेत. तसेच रस्त्यांमधील खड्ड्यांमुळे या परिसरात नेहमी वाहतुक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीमुळे लोकांचा कामाचा वेळ वाया जात आहे. हे रस्त्यातील खड्डे बुजवावेत अशी विनंती मी २६ जून रोजी आपल्याला पत्राद्वारे केली होती. मात्र आपल्याकडून याबाबत कोणत्याही प्रकारची कार्यवाही अद्याप पर्यंत करण्यात आलेली नाही.
त्यामुळे येथे एक ऑगस्ट रोजी आम्ही या खड्ड्यामध्ये वृक्षारोपण करीत आहोत. या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी आपण उपस्थित राहावे, आपल्या हस्ते काही खड्ड्यात वृक्षारोपण व्हावे, यासाठी शुक्रवार दिनांक १ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता कार्यक्रमास उपस्थित राहण्याची विनंती त्यांनी पत्राद्वारे केली आहे.
———————————————————


More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी