बावधन :
चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, बावधन येथे प्री-प्रायमरी विभागामार्फत पारंपरिक पद्धतीने *नागपंचमी* सण साजरा करण्यात आला. या कार्यक्रमातून “निसर्ग वाढवा – सर्प वाचवा” असा सकारात्मक आणि सामाजिक संदेश देण्यात आला. आपल्या संस्कृतीची जोड तोड न करता सण साजरा करून पर्यावरण संवर्धनाची जाणीव बालमनात रुजवण्याचा प्रयत्न यामधून करण्यात आला.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी पारंपरिक पोशाखात सहभाग घेतला. शाळेच्या प्री-प्रायमरी शिक्षकांनी सुंदर सजावट करून पारंपरिक *महाराष्ट्रीयन नागपंचमी* सण साकारला. कार्यक्रमादरम्यान मुलांनी सणाबद्दल माहिती मिळवली, खेळ खेळले, पारंपरिक गाणी गायली आणि आनंद लुटला. छोट्या मुलींनी आपल्या नाजूक हातांवर मेहंदीही लावली, ज्याने आनंद द्विगुणित झाला.
संपूर्ण कार्यक्रम शाळेचे अध्यक्ष मा. श्री. राजेंद्र बांदल, संचालिका सौ. रेखा बांदल, शाळेच्या संचालिका कु.शिवानी बांदल व मुख्याध्यापिका सौ. शुभदा कोलते यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी प्री-प्रायमरी विभागाच्या सर्व शिक्षिका आणि इन्चार्ज यांनी अतिशय नेटकेपणाने केली.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना सण, संस्कृती आणि पर्यावरण यांचे नाते समजून घेण्याची प्रेरणा मिळाली.





























More Stories
कोथरूड मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ९ च्या विकासकामांचा निधी रद्द; राजकीय वैमनस्यातून जनतेच्या कामात खोडा : अमोल बालवडकर
*म्हाळुंगे गावातील रस्ता व ड्रेनेजच्या कामांना गती* *ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्यासोबत म्हाळुंगे गावच्या शिष्टमंडळाची चर्चा*
*पिरंगुटच्या पेरिविंकलमध्ये व्यसनमुक्तीचा जागर; नागपंचमीच्या औचित्याने विद्यार्थ्यांनी घेतली व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा!!*