May 14, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

पाषाण येथिल कै. सहदेव एकनाथ निम्हण कुटी रुग्णालय मध्ये ‘कार्यसम्राट महाआरोग्य तपासणी शिबिराला’ सुरुवात..

पाषाण :

सोमेश्वर फाउंडेशनच्या माध्यमातून माजी नगरसेवक सनी निम्हण यांच्यावतीने कार्यसम्राट आमदार स्व.विनायक निम्हण यांच्या जयंती निमित्त आयोजित ‘कार्यसम्राट महाआरोग्य तपासणी शिबिर ३१ जुलै ते ४ ॲागस्ट दरम्यान पाषाण येथील कै. सहदेव एकनाथ निम्हण कुटी रुग्णालय येथे होणार असुन त्याचे उद्घाटन ह.भ.प. शांताराम महाराज निम्हण यांच्या हस्ते झाले.

 

कार्यसम्राट महाआरोग्य तपासणी शिबिरामुळे नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली जाणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या सर्व तपासणी मोफत होणार असून नागरिकांनी त्याचा लाभ घेत आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी नागरीकांच्या आरोग्याची दखल घेत सर्वांसाठी महत्वाचे असणारे महा आरोग्य शिबीर आयोजित केले असून सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा : ह.भ.प. शांताराम महाराज निम्हण

सदर महा आरोग्य तपासणी शिबीर सुतारवाडी येथील रणपिसे विठ्ठल मंदिर, सोमेश्वरवाडी येथील योगाभवन संजय गांधी ग्राम उद्यान, समाज मंदिर संजय गांधी वसाहत, या ठिकाणी देखिल होणार असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय निम्हण, अशोक दळवी, बाळासाहेब सातपुते, मधुकर निम्हण, संतोष नारायण निम्हण, सुधीर निम्हण, अजित निम्हण आदी मान्यवर उपस्थित होते.