पाषाण/कोथरूड :
सह्याद्री इंटरनॅशनल स्कूल, पाषाण येथे नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित केले जाते. २००१ मध्ये सुरू झालेल्या या शाळेने आता यशस्वी २५ वर्षे पूर्ण केली आहेत. या रौप्य महोत्सवी वर्षातही शाळेने आपली उत्कृष्ट शैक्षणिक परंपरा कायम राखली आहे.
शिक्षण आणि खेळासोबतच विद्यार्थ्यांमध्ये विविध कौशल्ये रुजवून त्यांना स्वतःच्या करिअरची दिशा शालेय जीवनातच मिळावी यासाठी सह्याद्री स्कूल नेहमीच प्रयत्नशील असते. याच प्रयत्नांचे फलित म्हणजे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शाळेने इयत्ता १०वी आणि १२वी कॉमर्स आणि सायन्स शाखेचा १००% निकाल नोंदवला आहे. पाषाण आणि कोथरूड येथील दोन्ही शाखांनी ही यशस्वी परंपरा गेली २५ वर्षे अखंडित ठेवली आहे, हे विशेष उल्लेखनीय आहे.
या नेत्रदीपक यशाबद्दल शाळेच्या संस्थापिका स्वातीताई विनायक निम्हण, पाषाण शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती पवार आणि कोथरूड शाळेच्या मुख्याध्यापिका वर्षा उदास यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी, त्यांचे पालक आणि शिक्षक या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रमाचे कौतुक केले आणि त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सह्याद्री इंटरनॅशनल स्कूलने पुन्हा एकदा आपल्या उत्कृष्ट निकालाच्या परंपरेने पाषाण आणि कोथरूड परिसरात अभिमानाचा आणि कौतुकाचा झेंडा फडकवला आहे.


More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी