कु.तन्वी बालपत्की ९४.२०% तर
प्रज्वल कवित्के गणित विषय १०० गुण
बावधन :
पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, बावधनने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. या वर्षीच्या एसएससी बोर्डाच्या निकालात शाळेने सलग १००% निकालाची परंपरा कायम राखत आपली उत्कृष्टता सिद्ध केली आहे. कुमारी तन्वी बालपत्की हिने ९४.२०% गुण प्राप्त करत बाजी मारली तर प्रज्वल कवित्के याने ९३.८० % गुण तर गणित विषयात १०० गुण प्राप्त केले. कुमारी क्रांति लोळे हीने ९०.२०% गुण पटकवले या आणि अशा अनेक विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय गुण मिळवत शाळेची मान उंचावली आहे.एकुण १०५ विद्यार्थी एसएससी परीक्षेला बसलेले होते. २९ विद्यार्थी ८०% पेक्षा जास्त गुण मिळवत यशस्वी झाले आहेत.
शाळेच्या या यशामागे संस्थापक संचालक श्री. राजेंद्र बांदल, संचालिका रेखा बांदल व शिवानी बांदल यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. निर्मल पंडीत यांचे प्रभावी व्यवस्थापन महत्त्वाचे ठरले आहे. पर्यवेक्षिका कल्याणी शेळके, प्रज्ञा जोशी व शीरीन क़ाझी यांनी सहकार्य करत विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करून शाळेने त्यांना उज्ज्वल भवितव्याची दिशा दिली.
या यशाचे खरे शिल्पकार म्हणजे मेहनती शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांना सतत प्रोत्साहन देणारे पालक. त्यांच्या समर्पणामुळंच हे यश शक्य झाले आहे. शाळेच्या संपूर्ण टीमचे, शिक्षकांचे आणि पालकांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.
पेरीविंकल स्कूलने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, दर्जेदार शिक्षण व एकत्रित प्रयत्न हेच यशाचे खरे सूत्र आहे.
More Stories
बालेवाडी येथील सी एम इंटरनॅशनल स्कूल चा शैक्षणिक वर्ष २०२४ – २५ चा इयत्ता दहावी चा निकाल १००%
बाणेर-बालेवाडी, सुस, म्हाळुंगे परिसरातील पावसाळी व ड्रेनेज लाईनच्या साफसफाईची सौ. पूनम विधाते यांची पालिका प्रशासनाकडे मागणी..
पाषाण कोथरूड मधील सह्याद्री इंटरनॅशनल स्कूलची २५ वर्षांची यशस्वी वाटचाल; दहावी आणि बारावीचा १००% निकाल!