August 27, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

परिश्रमाचे उमलते फळ – पेरिविंकल पिरंगुटच्या दहावीच्या निकालाने पुन्हा गाठला १००% यशाचा टप्पा!”

कु.श्रुती पुरुषोत्तम जावळे 95% मिळवून प्रथम!

पिरंगुट (ता. मुळशी) –

चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लिश मिडीयम स्कूलने यावर्षीच्या शैक्षणिक वर्ष २०२४ – २५ बॅच चा इयत्ता दहावीच्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षेत पुन्हा एकदा शंभर टक्के निकालाची परंपरा जपत गौरवशाली कामगिरी केली आहे.प्रथम क्रमांक जावळे श्रुती पुरुषोत्तम 94.80%, द्वितीय क्रमांक सातव कार्तिकी दिनेश 90%, तृतीय क्रमांक पाटील अथर्व विठ्ठल 88.40%.
विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुणांसह शाळेचे नाव उज्ज्वल केले असून अनेक विद्यार्थ्यांनी श्रेणीप्रमाणे विशेष प्राविण्य प्राप्त केले. शाळेने नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला आहे आणि त्याचेच फलित म्हणून यंदाचा निकालही उल्लेखनीय ठरला आहे. परीक्षेतील यश हे विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण अभ्यासाचा, शिक्षकांच्या मार्गदर्शनाचा आणि पालकांच्या पाठिंब्याचा संमिश्र परिणाम आहे.

 

या यशामध्ये संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल, संचालिका रेखा बांदल व शिवानी बांदल, तसेच प्राचार्य निर्मल पंडित,आसावरी हंचाटे पर्यवेक्षिका पूनम पांढरे आणि इंदू पाटील, सना इनामदार, पल्लवी नारखेडे यांचे मोलाचे योगदान राहिले.

यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान शाळेच्या वतीने करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शिक्षकवृंदांनी विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक करत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरित केले.

पेरिविंकल स्कूलने पुन्हा एकदा सिद्ध केले की, शिस्तबद्ध शिक्षण, योग्य मार्गदर्शन आणि कठोर परिश्रम या त्रिसूत्रीच्या जोरावर यश हमखास मिळवता येते.