May 5, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

योगेश सुतार यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत केला साजरा…

सुतारवाडी :

सुतारवाडी गावातील राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहरचे सरचिटणीस योगेश सुतार यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून सुतारवाडी समस्त सुतार विठ्ठल मंदिर, समस्त रणपिसे विठ्ठल मंदिर, पाषाण विठ्ठल मंदिर, सोमेश्वरवाडी विठ्ठल मंदिर व बावधन खुर्द विठ्ठल मंदिरांना भजन कीर्तन साठी आवश्यक असणारे पखवाद वाद्य भेट दिले. तसेच काही महिन्यांपूर्वी दुदैवी रित्या हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालेल्या अथर्व दीपक शिंदे याच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यात आली.

 

वाढदिवस साजरा करत असताना समाजाशी असणारी बांधिलकी जपण्याचे हेतूने परिसरात असणारा सांप्रदायिक क्षेत्रातला वावर लक्षात मंदिरांना पखवाद वाद्य भेट म्हणून दिले तसेच सुतारवाडी गावातील कै. अथर्व दीपक शिंदे या युवकाचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले होते. तर कोरोना काळात वडिलांचे देखिल निधन झाले होते. त्याच्या पाश्चात्य आई आणि बहीण हा परिवार असल्याने घरातील कर्ता पुरुष गेल्याने घराचा आधार हरपला, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नाजूक झाली. म्हणून त्या कुटुंबाला हातभार म्हणून आर्थिक मदत केली – योगेश सुतार (सरचिटणीस पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस)

यावेळी परिसरातील सांप्रदायिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.