बालेवाडी :
चिंचवड येथे महाराष्ट्र व गोवा नोटरी असोसिएशनच्या पाचव्या अधिवेशनात पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. पांडुरंग ज्योतिबा थोरवे यांना “उत्कृष्ट विधी सेवा पुरस्कार” प्रदान करण्यात आला. हा सन्मान सर्वोच्च न्यायालय, दिल्लीचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांच्या हस्ते देण्यात आला.
थोरवे यांच्या दीर्घ, यशस्वी आणि प्रेरणादायी विधी सेवांचा गौरव करण्यासाठी आयोजित या सोहळ्यास सर्वोच्च न्यायालय व मुंबई उच्च न्यायालयातील सन्माननीय न्यायमूर्ती, तसेच विधी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
थोरवे यांनी पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असताना अनेक विधायक उपक्रम राबविले. विविध कायदासंमेलनांमध्ये सक्रीय सहभाग घेत, हायकोर्ट व सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती, माजी राष्ट्रपती, राज्यपाल, नामवंत विचारवंत व तज्ज्ञ वकील यांच्या साक्षीने अनेकदा सन्मान मिळवला आहे. त्यांना याआधी सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचा युथ आयकॉन राष्ट्रीय पुरस्कारासह १०० पेक्षा अधिक सन्मान प्राप्त झाले आहेत. न्यायविषयक जाणीवजागृतीसाठी दिलेली त्यांची व्याख्याने विशेष उल्लेखनीय ठरली आहेत.
या कार्यक्रमाला विधानसभा उपसभापती अण्णा बनसोडे, न्या. रेवती मोहिते डेरे, न्या. संदीप मारणे, न्या. आरिफ डॉक्टर, प्रमुख जिल्हा न्यायाधीश महेंद्र महाजन यांच्यासह मोठ्या संख्येने वकील वर्ग उपस्थित होता.
कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र व गोवा नोटरी असोसिएशनतर्फे करण्यात आले होते. अध्यक्ष अॅड. सय्यद सिकंदर अली, कार्याध्यक्ष अॅड. यशवंत खराडे, सेक्रेटरी अॅड. प्रविण नलवडे, उपाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र अॅड. विवेक भरगुडे, निरीक्षक पश्चिम महाराष्ट्र अॅड. अतिश लांडगे, पुणे जिल्हाध्यक्ष ॲड. कल्याण शिंदे, पुणे शहर अध्यक्ष ॲड. आशिष ताम्हाणे यांच्या नेतृत्वाखाली सोहळा पार पडला.
संपूर्ण कार्यक्रम प्रा. रामकृष्ण मोरे सभागृह, चिंचवड येथे मोठ्या उत्साहात पार पडला.


More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी