बाणेर :
रक्षाबंधन सण म्हटले की भाऊ बहिणीचा जिव्हाळ्याचा, आपुलकीचा व प्रेमाचा, आपल्या नात्याचा असतो असेच काहीसे चित्र बाणेर मध्ये आज रक्षाबंधन निमित्त दिसून आले.
प्रत्येक वर्षी गोरगरिबांची दिवाळी गोड व्हावी यासाठी दिवाळी सरंजामचा वाटप असो अथवा कोरोना सारख्या महा संकटाच्या काळामध्ये गोरगरिबांसाठी धान्य वाटप असो अनेकांच्या संकटांमध्ये धावून येणारे, पडत्या काळामध्ये साथ देणारे, तसेच इयत्ता १० वी, १२ वी मधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ, शिक्षक दिन , ज्येष्ठ नागरिक दिन, गौरी गणपती स्पर्धा, वकील दिन असे अनेक उपक्रम राबविणारे बाणेर परिसराला लाभलेले चांदेरे कुटुंबीय या कुटुंबीयांना न विसरणारे तसेच त्यांचे आभार मानणारे सर्वसामान्य नागरिक या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वास्तव्य करीत आहेत तसेच या सर्व गोष्टीवांची जाणीव सर्वसामान्य बंधू आणि भगिनींना असल्याकारणाने सर्वसामान्य गोरगरीब चांदेरे कुटुंबीयांना कधीही विसरू शकत नाही.
याचेच प्रत्यय आज रक्षाबंधन या सणा निमित्त दिसून आले. या परिसरातील अनेक गोरगरीब भगिनींनी चांदेरे कुटुंबीयांसमवेत रक्षाबंधन हा सण साजरा केला.
यावेळी समीर चांदेरे अतिशय भावनिक होऊन त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना असे म्हटले की बाणेर, बालेवाडी, सुस आणि म्हाळुंगे भागातील अनेक बहिणींनी निवासस्थानी येऊन आज प्रेमाने राखी बांधली… त्यांच्या डोळ्यातला विश्वास, मनातली माया आणि दिलेल्या आशीर्वादाची ताकद हीच माझ्यासाठी खरी संपत्ती आहे.
लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत माझ्या लाडक्या बहिणींनी आवर्जून उपस्थित राहून राखी पौर्णिमा साजरी केली, ही माझ्यासाठी खूप आनंदाची आणि उत्साहाची गोष्ट आहे.
हा केवळ राखीचा धागा नाही, तर परस्पर जिव्हाळा आणि साथ दाखवणारा पवित्र बंध आहे. या आपुलकीबद्दल प्रत्येक बहिणीचे मी मनापासून आभार मानतो अश्या शब्दात भावनिक साद यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहर युवक अध्यक्ष समीर चांदरे यांनी घातली.
यावेळी बाणेर, बालेवाडी, सुस व म्हाळुंगे या परिसरातील असंख्य भगिनी या प्रसंगी उपस्थित होत्या.



More Stories
बालेवाडीत कचरा समस्येवर मोरेश्वर बालवडकर यांचे सहाय्यक आयुक्तांना निवेदन; १५ दिवसांत उपाय न झाल्यास आंदोलनाचा इशारा
नसरापूर येथील चिमुरडीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीचा मेणबत्ती मोर्चा
गायनातून भाव व्यक्त होणे अत्यावश्यक : पं. उपेंद्र भट सोमेश्वर फाउंडेशनतर्फे २४ व्या ‘पुणे आयडॉल- 2026’ स्पर्धेचे उद्घाटन