सोमेश्वरवाडी :
श्रावण महिना सुरू झाल्यामुळे पाषाण येथील सोमेश्वर मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, मंदिरामागील मुख्य रस्ता अत्यंत खराब असल्याने भाविक आणि स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. माजी नगरसेवक प्रमोद निम्हण यांच्या पुढाकारामुळे हा रस्ता आता सुस्थितीत आणण्यात आला असून, भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सोमेश्वर मंदिराला जोडणाऱ्या या कच्च्या रस्त्याची दुरवस्था झाली होती. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते आणि चालणेही अवघड झाले होते. यामुळे विशेषतः श्रावण महिन्यात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना त्रास होत होता. ही बाब लक्षात घेऊन, माजी नगरसेवक प्रमोद निम्हण यांनी तातडीने या प्रश्नाकडे लक्ष दिले.
त्यांनी स्वखर्चातून रस्त्यावरील खड्डे बुजवून, मुरूम टाकून आणि रस्ता समतल करून तात्काळ दुरुस्ती करण्यात आली. त्यामुळे आता हा रस्ता सुरक्षित आणि सुलभ झाला आहे. या कामामुळे स्थानिक नागरिक आणि भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे. प्रमोद निम्हण यांनी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सहकार्य करणाऱ्या स्थानिक नागरिकांचेही आभार मानले आहेत.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी