February 4, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, बावधन, येथे विद्यार्थ्यांचा राखीपौर्णिमेचा अनोखा विचार “आमची राखी सैनिकांनप्रति कृतज्ञतेची राखी”

बावधन (९ ऑगस्ट २०२५) :

पेरिविंकल इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज, बावधन, शाळेतील विद्यार्थ्यांकडून सीमारेषेवरच्या सैनिकांना राख्या प्रेषित

आमच्या शाळेत रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने एक विशेष उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी आपल्या हाताने सुंदर राख्या तयार करून त्या सीमारेषेवर, बारामुल्ला, जम्मू काश्मीर, येथे तैनात असलेल्या भारतीय सैनिकांना पाठविल्या. या उपक्रमाचा उद्देश सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे व त्यांना भावनिक आधार देणे हा होता.

विद्यार्थ्यांनी राख्यांसोबत प्रेमळ शुभेच्छा पत्रेही लिहिली, ज्यातून सैनिकांविषयीचा अभिमान, आपुलकी आणि देशभक्ती स्पष्ट दिसून आली.

शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शुभदा कोलते यांनी या प्रसंगी सांगितले की, “सैनिक हे आपल्या सुरक्षेचे खरे रक्षक आहेत. त्यांच्यापर्यंत आपल्या प्रेमाचा हा धागा पोहोचवणे म्हणजे त्याग व सेवेसाठी त्यांचा सन्मान करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.”

बारामुल्ला बटालियन मधील कॅप्टन Shri Roshan Kumar (Assistant Commandant ) Sopor ,Baramulla Jammu and Kashmir.
Inspector Suresh Chand Meena यांनी स्वतः फोन करुन आमच्या शाळेतील या उपक्रमाबद्दल आभार व्यक्त केले, त्यांची ही भावना खरोखर आमच्यासाठी अभिमानाची आणि आनंदची ठरली.

शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री. राजेंद्र बांदल सर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, रक्षाबंधन हा फक्त भाऊ-बहीण यांच्यातील प्रेमाचा सण नसून समाजात परस्पर विश्वास, सहकार्य आणि जपणुकीचा संदेश देणारा सण आहे. विद्यार्थ्यांनी देशातील सैनिकांना राख्या पाठवून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

संस्थेच्या संचालिका सौ रेखा बांदल आणि कु. शिवानी बांदल यांनी देखील विद्यार्थ्याच्या या उपक्रमाचे कौतुक करत भारतीय जवानांना राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या पर्यवेक्षिका शिरीन काझी आणि सायली गायकवाड यांच्या सोबत चित्रकला शिक्षिका प्राजक्ता पिल्ले, स्नेहल गंगशेट्टीवर आणि सांस्कृतिक समितीने केले व सर्व शिक्षक-विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.

संपूर्ण उपक्रमात सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता व शाळेत देशभक्तीचे वातावरण पसरले.