म्हाळुंगे :
भोर-राजगड-मुळशी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय, जनसंपर्कशील आमदार शंकर भाऊ मांडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त, सौ. पूनम विशाल विधाते (कार्याध्यक्ष – राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी, पुणे शहर) यांच्या माध्यमातून प्रकृती अभियानांतर्गत वृक्षारोपणाचा उपक्रम म्हाळुंगे टेकडी, म्हाळुंगे (पुणे) येथे उत्साहात पार पडला.
या उपक्रमात तरुण, महिला, जेष्ठ नागरिक तसेच स्थानिक रहिवाशांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. सर्वांनी स्वतःच्या हाताने वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केला आणि हरित शुभेच्छांद्वारे आमदार शंकर भाऊंना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
सौ. पूनम विशाल विधाते यांनी यावेळी सांगितले की –
“निसर्गाची सेवा म्हणजेच खऱ्या अर्थाने समाजसेवा. झाडे लावणे, त्यांची निगा राखणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. आज लावलेले हे रोपे उद्या आपल्या परिसराचे हिरवे भविष्य घडवतील.”
या वृक्षारोपण सोहळ्याचा उद्देश फक्त झाडे लावणे नव्हता, तर नागरिकांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करणे हा होता.
प्रकृती अभियानाच्या माध्यमातून शहर व परिसरात अधिकाधिक हरित क्षेत्र वाढवणे, जैवविविधतेचे संवर्धन करणे आणि प्रदूषण नियंत्रणासाठी सामूहिक प्रयत्न करणे हेही उद्दिष्ट ठेवलं आहे.
या उपक्रमाला अनेक सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक रहिवासी, महिला संघटना व युवक मंडळांचा सक्रिय पाठिंबा लाभला. सहभागी नागरिकांनी “आमदार शंकर भाऊ मांडेकर यांना हरित शुभेच्छा देण्याचा हा एक आगळा-वेगळा मार्ग आहे” असे सांगत पूनम विशाल विधाते यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले
यावेळी अनेक सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक नागरिक, तरुण मंडळी तसेच महिला संघटनांनी सक्रिय सहभाग घेतला.




























More Stories
कोथरूड विधानसभा मधील पाषाण-सुतारवाडी लिंक रोड वरील कचऱ्यावरून राजकारण पेटले! अमोल बालवडकरांच्या इशाऱ्यानंतर प्रशासन खडबडून जागे; पण तत्परता फक्त ‘खास’ भागापुरतीच का?
सुस परिसर वाहतूक कोंडीबाबत अनिकेत चांदेरे यांच्याकडून वाहतूक पोलिसांना निवेदन
मैत्रीचा धागा, विश्वासाचे नाते! युवा स्पंदनतर्फे चतुःश्रुंगी व कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये फ्रेंडशिप डे उपक्रम