बालेवाडी :
बालेवाडी गावातील स्मशानभूमीचा परिसर स्वच्छ करण्याचे काम राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुणे शहर उपाध्यक्ष राहुल बालवडकर यांच्या पुढाकाराने हाती घेण्यात आले. या मोहिमेत स्मशानभूमीच्या सभोवतालचा परिसर पूर्णपणे स्वच्छ करण्यात आला. तसेच खराब अवस्थेत असलेला बाहेरील विसावा कट्टाही दुरुस्त करून घेण्यात आला.
या कामाविषयी बोलताना राहुल बालवडकर म्हणाले, “ग्रामस्थांना अंतिम संस्कार करताना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी आम्ही स्मशानभूमीच्या स्वच्छतेचे काम हाती घेतले. तसेच, अंत्यविधीसाठी येताना असलेला विसावा कट्ट्याची दुरुस्ती करणे गरजेचे होते. स्थानिक नागरिकांची ही अनेक दिवसांपासूनची मागणी होती, ती पूर्ण केल्याने आम्हाला समाधान वाटत आहे.”
हे काम पूर्ण झाल्याने स्थानिक नागरिकांनी राहुल बालवडकर यांच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले आहे.



More Stories
बालेवाडीतील 1 कोटी रुपये खर्चून बांधलेली भाजी मांडई बंद का? — नागरिकांकडून उत्तरदायित्वाची मागणी, जयेश मुरकुटे यांचा जनआंदोलनाचा निर्धार
बाणेर मुळा नदी घाटावर छठ महापर्व उत्साहात साजरा — डॉ. दिलीप मुरकुटे यांच्या वतीने आयोजीत कार्यक्रमात शेकडो उत्तर भारतीय बांधवांची उपस्थिती
बालेवाडीतील छठ पूजेत श्रद्धा, आस्था आणि उत्साहाचा संगम.. अमोल बालवडकर फाउंडेशन, नॉर्थ कम्युनिटी वेलफेअर सोसायटी व अरविंदकुमार सिंग यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आयोजन