सुसगाव:
भाजपा नेते श्री. सुहास भोते आणि धनश्री सुहास भोते यांच्या पुढाकाराने सुसगावात ‘घर घर तिरंगा’ अभियानाचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्री. राजेश पांडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या उपक्रमाची सुरुवात झाली. येणाऱ्या १४ ऑगस्ट पर्यंत नागरिकांसाठी ध्वज उपलब्ध करून दिला जाणार आहे.
यावेळी भाजपा पुणे शहर सरचिटणीस श्री. गणेश कळमकर यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. या उपक्रमाअंतर्गत तिरंगा ध्वज आणि ध्वज लावण्यासाठी लागणाऱ्या साहित्याचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी भाजपा नेते प्रल्हाद सायकर, राहुल कोकाटे, शरद तात्या भोते, भाजपा कोथरूड उत्तर मंडल उपाध्यक्ष काळुराम गायकवाड, बाणेर-बालेवाडी प्रभाग अध्यक्ष सुभाष भोळ, भाजपा कोथरूड उत्तर मंडल युवा मोर्चा अध्यक्ष अनिकेत चांदेरे, कल्याणी टोकेकर, जागृती विचारे, दिनेश ससार, नवनाथ चांदेरे, सचिन चांदेरे, गजानन चांदेरे, चंद्रकांत जाधव, बापू भोते यांच्यासह परिसरातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा उपक्रम देशाप्रती आदर आणि राष्ट्रप्रेम वाढवण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आला असून त्याला स्थानिक नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
More Stories
“मिशन निर्मल” अभियानाचा बाणेर-बालेवाडी मधील १७ वा व १८ वा दिवस — स्वच्छतेसाठी नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग! अमोल बालवडकर यांचा उपक्रम…
पाषाण परिसरातील नागरिकांना दिलासा प्रमोद निम्हण यांच्या प्रयत्नातून ड्रेनेज लाईन कामाचा शुभारंभ..
सूस शाखेतील पेरीविंकल इंग्लिश मिडीयम स्कूल येथे वन्यजीव संरक्षण जनजागृती सप्ताहानिमित्त प्रेरणादायी उपक्रम