August 28, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

औंध, गोखले नगर परिसरात रक्षाबंधन निमित्त सचिन मानवतकर यांच्या वतीने लाडक्या बहिणीसाठी मोफत मेहंदी काढण्यात येणार..

औंध –

रक्षाबंधनाचा सण आता जवळ आला आहे. यानिमित्त भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे निमंत्रक श्री. सचिन मानवतकर आणि त्यांच्या पत्नी सौ. निशा मानवतकर यांनी बहिणींसाठी एक अनोखा उपक्रम आयोजित केला आहे. रक्षाबंधन उत्सवाच्या निमित्ताने, श्री. सचिन मानवतकर यांच्यातर्फे लाडक्या बहिणींसाठी मोफत मेहंदी काढण्यात येणार आहे.

 

शिवाजीनगर मतदारसंघातील विविध १० ठिकाणी हा उपक्रम राबवला जाणार आहे. यामध्ये येथील साईबाबा मंदिर (वैदुवाडी), कुसाळकर चौक, श्री स्वामी समर्थ मंदिर (स्वामी समर्थ चौक), पंचमुखी हनुमान चौक (गोखलेनगर मेन रोड), अरुण कदम चौक (जनवाडी मस्जिद), साईराम चौक (जनवाडी), निलज्योती सोसायटी, वीर सावरकर चौक (गोखलेनगर), कस्तुरबा गांधी वसाहत (औंध), आणि इंदिरा गांधी वसाहत (औंध) या ठिकाणांचा समावेश आहे.

हा उपक्रम बहिणींसाठी रक्षाबंधनाचा आनंद द्विगुणीत करेल, अशी आशा आयोजकांनी व्यक्त केली आहे. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक ९०७५०३५३३५ आणि ७०५७५२९४७८ उपलब्ध करून देण्यात आला आहे.