बाणेर :
बाणेर परिसरात ‘माझा प्रभाग, स्वच्छ प्रभाग’ या स्वच्छता अभियानाचा शुभारंभ विधान परिषद आमदार प्रसाद लाड यांच्या हस्ते करण्यात आला. नगरसेविका सौ. स्वप्नाली प्रल्हाद सायकर यांच्या पुढाकाराने आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
यावेळी बोलताना आमदार प्रसाद लाड यांनी, नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नेहमी कार्यरत राहावे असे आवाहन केले.
नागरिकांनी एकत्र येऊन आपला परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचे आवाहन करत नागरिकांच्या अडचणी प्राधान्याने सोडविणे हे आमचे कर्तव्य असून त्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे भाजप नेते श्री. प्रल्हाद सायकर यांनी सांगितले.
याप्रसंगी बोलताना माजी नगरसेविका स्वप्नाली सायकर यांनी, आज सुरू झालेल्या या अभियानात सर्वांनी सहभागी होऊन आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे सांगितले.
या कार्यक्रमाला माजी नगरसेवक श्री. अमोल बालवडकर, माजी नगरसेविका सौ. ज्योतीताई कळमकर, भाजप पुणे शहराचे उपाध्यक्ष श्री. राहुल कोकाटे, कोथरूड विधानसभा (उत्तर) अध्यक्ष श्री. लहू बालवडकर यांच्यासह गणेश कळमकर, माजी प्रकाशतात्या बालवडकर, सचिन पाषाणकर आणि इतर पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच, टेलिफोन एक्सचेंजजवळील सोसायटीमधील आरती राव, भारती फर्नांडिस, आनंद रणवरे, सौ. कुलकर्णी, गौरव नाटेकर, प्रणव राव आणि इतर नागरिकही उपस्थित होते.



More Stories
ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश, सुतारवाडी बस डेपोच्या २४ मीटर रस्त्याच्या कामाचा शुभारंभ
महाळुंगे (पाडाळे) येथे “न्यू होम मिनिस्टर” कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद! प्रियांका विनायक चिव्हे यांचा उपक्रम..
बालेवाडीत ‘द्वादश मल्हार दर्शन’चा भव्य अध्यात्मिक सोहळा, भारतातील १२ मार्तंड-मल्हार मंदिरांच्या पादुकांचे प्रथमच पुण्यात दर्शन.