May 8, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

‘कार्यसम्राट मोफत महाआरोग्य शिबिर’ निमित्त सोमेश्वरवाडी आणि सुतारवाडी ग्रामस्थ उपस्थित राहून घेणार शिबिराचा लाभ..

पाषाण :

सोमेश्वर फाउंडेशनच्या माध्यमातून माजी नगरसेवक सनी निम्हण यांच्यावतीने ‘कार्यसम्राट मोफत महाआरोग्य शिबिराचे’ आयोजन ६ ऑगस्ट रोजी करण्यात आलेले आहे. या शिबिराची माहिती सुतारवाडी आणि सोमेश्वरवाडी गावातील नागरिकांना समजावे व त्याचा प्रसार होऊन जास्तीत जास्त गरजु नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा म्हणून नुकतीच ग्रामस्थांसोबत बैठक सनी निम्हण यांनी घेतली.

 

आपल्या ‘कार्यसम्राट मोफत महाआरोग्य शिबिराची’ तयारी अतिशय जोशात सुरू आहे. नागरिकांचा उदंड प्रतिसाद शिबीरास लाभत आहे. त्यात आम्हीही स्वयंसेवकांसोबत घरोघरी जाऊन नागरिकांना याची माहिती दिली आणि बैठका घेतल्या त्यामुळे नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. सुतारवाडी आणि सोमेश्वरवाडीच्या नागरीकांना कार्यसम्राट मोफत महाआरोग्य शिबिराची संपूर्ण माहिती आणि याद्वारे मिळणाऱ्या सोयी-सुविधांबाबत माहिती दिली. ग्रामस्थांनी देखील या शिबिरासाठी उत्सुकता दाखवून गरजू लोकांपर्यंत या शिबिराचा प्रसार करू व मोठया संख्येनं शिबिरास उपस्थित राहून लाभ घेऊ असा शब्द दिला – माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण

‘कार्यसम्राट मोफत महाआरोग्य शिबिर’ तिन टप्प्यात होणार असून पहिल्या टप्प्यात ३१ जुलै ते ४ ऑगस्ट पर्यंत व चाचण्या व तपासण्या फ्री मध्ये करून घेतल्या जाणार आहेत. दुसरा टप्प्यात ६ऑगस्ट रोजी मोफत कॅम्प होणार असून ७ ऑगस्ट ते ७ ऑक्टोबर दरम्यान आवश्यक असणाऱ्या सर्व शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार आहेत.

यावेळी सोमेश्वरवाडी गावातील पोपटराव जाधव, खंडू शेठ अरगडे, शामराव काकडे, काळूराम काकडे, रोहिदास घोलप, जगन्नाथ दळवी, धनाजी बबन जाधव, धनंजय बामगुडे, दत्ता शेलार, राजू बामगुडे, तारामण जाधव, गुलाब जोरे, भरत जोरे, उत्तम काकडे, राजेंद्र लंबाते, कैलास बामगुडे, सोनबा काकडे, बळवंत निम्हण, संजय निम्हण, विनायक काकडे, रोहन उर्फ बाळा रानवडे, अतुल काकडे, विक्रम जाधव आदी उपस्थित होते.

यावेळी सुतारवाडी गावातील गोविंदशेठ रणपिसे, शामदादा रणपिसे, बालम सुतार,वाढेश्वर सुतार, पांडुरंग सुतार, शंकर रणपिसे, दगडु जाधव, जयसिंग सुतार, काळूराम सुतार, रमेश सुतार, नितीन रणपिसे, सचिन रणपिसे, संजय निम्हण, निलेश निम्हण, वासुदेव कोकाटे, बाळासाहेब बानगुडे, प्रीतम निम्हण, अनंता रणपिसे, किसन सुर्वे, अमित रणपिसे, रोहित रणपिसे, प्रवीण रणपिसे, अतुल रणपिसे, योगेश सुतार, महेश सुतार, समीर सुतार, सुरज रणपिसे, कैलास रणपिसे आणि तसेच शिवराय मित्र मंडळाचे कार्यकर्ते आणि सुतारवाडीतील ज्येष्ठ महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.