बाणेर :
येथील योगीराज पतसंस्थेचे उपाध्यक्ष श्री. राजेश शंकरराव विधाते यांच्या मातोश्री, श्रीमती विमल शंकरराव विधाते यांचे अल्पशा आजाराने दिनांक ५ मे रोजी सायंकाळी ७ वाजता निधन झाले. त्या 76 वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाने विधाते कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
श्रीमती विमल विषयात यांनी प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या कुटुंबाला आधार दिला. त्यांचे पती, कै. शंकरराव विधाते यांचे १९८१ साली निधन झाल्यानंतर त्यांनी मोठ्या धैर्याने शेती सांभाळली आणि आपल्या सर्व मुला-मुलींना उच्च शिक्षण दिले. आज त्यांची दोन्ही मुले, संजय विधाते (एनएसयूआयचे माजी पुणे शहर अध्यक्ष) आणि राजेश विधाते (उपाध्यक्ष, योगीराज पतसंस्था) तसेच मुलगी वंदना नखाते आपापल्या क्षेत्रात यशस्वी आहेत.
श्रीमती विमल शंकरराव विधाते या बाणेरचे माजी सरपंच कै. अर्जुनभाऊ विधाते यांच्या वहिनी आणि माजी सरपंच श्रीरंगराव विधाते यांच्या चुलती होत्या. कै. अर्जुनभाऊ विधाते सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असताना, त्यांचे बंधू कै. शंकरराव विधाते यांनी कुटुंबाची शेती अत्यंत सचोटीने सांभाळली होती. दुर्दैवाने कै. शंकरराव विधाते यांचे 1981 साली निधन झाले त्यांच्या पश्चात विमल विधाते यांनी शेती सांभाळत कुटुंबाचा भार उचलला.
श्रीमती विमल विधाते यांच्या पार्थिवावर आज बाणेर येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.


More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!