May 29, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बालेवाडीत हरवलेली तीन मुले शिवम बालवडकर यांच्या प्रयत्नाने एका तासात सापडली!

बालेवाडी :

आज सकाळी साडेनऊ ते दहाच्या सुमारास निकिता ओम ठाकूर, अन्या गणेश ठाकूर आणि शिव ओम ठाकूर या तीन मुलांचे पालक भाजपा पुणे शहर युवा मोर्चा उपाध्यक्ष शिवम बालवडकर यांच्याकडे आपल्या मुलांच्या हरवल्याची तक्रार घेऊन आले.

 

त्यानंतर शिवम बालवडकर यांनी त्वरित व्हॉट्सॲप ग्रुपवर माहिती शेअर केली आणि समाजातील सजग नागरिकांनी सहकार्य करत केवळ एका तासात या मुलांना सुरक्षितपणे शोधून काढले!

ही केवळ एक घटना नाही, तर आपल्या समाजाच्या एकतेचे आणि सजगतेचे प्रतीक आहे, असे मत शिवम बालवडकर, उपाध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा, पुणे शहर यांनी व्यक्त केले.