बालेवाडी :
सी एम इंटरनॅशनल स्कूल ज्युनिअर कॉलेजने शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये इयत्ता बारावीच्या एचएससी बोर्ड परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन केले आहे. शाळेचा निकाल १००% लागला असून, विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत संस्थेची गौरवशाली परंपरा कायम राखली आहे.
विद्यार्थ्यांच्या कठोर मेहनत, शिस्त आणि दृढनिश्चयाचे हे फलित आहे. संस्थेचे व्यवस्थापन, प्राचार्य, शिक्षक, कर्मचारी, पालक आणि विद्यार्थ्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हे यश शक्य झाले, असे संस्थेने म्हटले आहे.
या परीक्षेत मोहम्मद शेख याने ८४.६७% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला, तर अनिशा पाटील हिने ८३.१७% गुणांसह द्वितीय आणि निखिल पावडे व निरंजन बाळवडकर यांनी ८२.६७% गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला. याशिवाय अन्वेता शिंदे (८१%) आणि जयश्री पाडाळे (८०.५०%) यांनीही उल्लेखनीय यश मिळवले.
विषयवार प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचाही संस्थेने गौरव केला आहे. इंग्रजी विषयात अन्वेता शिंदे (८७/१००), गणितात मोहम्मद शेख (८४/१००), रसायनशास्त्र विषयात मोहम्मद शेख आणि निखिल पावडे (प्रत्येकी ८४/१००), भौतिकशास्त्र विषयात मोहम्मद शेख (८२/१००), हिंदी विषयात जयश्री पाडाळे (८०/१००), जीवशास्त्र विषयात अन्वेता शिंदे (९०/१००), संगणक विज्ञान विषयात मोहम्मद शेख (१७८/२००), जर्मन विषयात अन्वेता शिंदे (८९/१००), माहिती तंत्रज्ञान विषयात अनिशा पाटील आणि समृद्धी देशमुख (प्रत्येकी ९७/१००) आणि भूगोल विषयात अनिशा पाटील (८९/१००) यांनी सर्वाधिक गुण मिळवले.
More Stories
औंध येथे सोमेश्वर फाऊंडेशन आयोजित पुणे आयडॉल स्पर्धेचे उद्घाटन संपन्न*
महाळुंगे आणि सुस परिसरातील नागरिकांच्या समस्यां सोडविण्यावर भर देणार आमदार शंकर भाऊ मांडेकर यांचे ‘जनता दरबार’, मध्ये नागरिकांना आश्वासन…
औंधगाव ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज उत्सव २०२५ आनंदात साजरा