May 18, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

पेरीविंकलच्या 12वी च्या 100% निकालाची परंपरा कायम राखत विद्यार्थ्यांचे घवघवीत यश !

सुस :

चैतन्य विद्या प्रतिष्ठान च्या पेरिविंकल इंग्लिश मिडीयम स्कुल अँड ज्युनियर कॉलेज च्या शै.वर्ष २०२४-२५ बॅच चा इयत्ता 12 वी च्या सर्व विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून उज्जवल यशाबरोबरच मागील
वर्षाप्रमाणेच या वर्षीही 100% निकालाची परंपरा कायम ठेवून आर्टस् कॉमर्स व सायन्स या तिन्ही क्षेत्रात बाजी मारली आहे.

 

यंदाच्या बारावीच्या परीक्षेत पेरीविंकल इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सुस येथून एकूण ७७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातून कला शाखेतून द्रौपती चौधरी या विद्यार्थिनीने 89% गुण प्राप्त करत अव्वल स्थान पटकावून आपले नाव प्रथम क्रमांकावर कोरले. तर शास्त्र म्हणजेच सायन्स शाखेत वैभव देवासी याने 80% गुण संपादन करून शास्त्र शाखेत प्रथम क्रमांक मिळवला असून प्रज्ञा हंद्रले हिने 72.67% गुण मिळवून तर पार्थ पंडित याने 72.33 गुण मिळवत द्वितीय व तृतीय स्थान पटकवले आहे तर कॉमर्स म्हणजेच वाणिज्य या शाखेत कोमल अडलिंगे हीने 75% गुण मिळवत प्रथम स्थान प्राप्त केले. तर मानसी शर्मा या विद्यार्थिनीने द्वितीय स्थान व सुहानी शिंदे हिने 71.17% मिळवून तृतीय क्रमांक पटकवत बाजी मारली आहे.

सर्वच विद्यार्थ्यांनी उत्तम क्रमांकाने उत्तीर्ण होत महाविद्यालयातील सर्व शिक्षक यांच्या प्रयत्नांची पराकाष्ठा व त्यांना तशीच सार्थ साथ देणारे सर्वच विद्यार्थी आणि पालकवर्ग यांच्या परिश्रमाचे चीज म्हणजेच आजचा 100% निकाल.

या सगळ्याला कायम पाठिंबा असणारे शाळेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राजेंद्र बांदल सर , तसेच संचालिका सौ रेखा बांदल व शिवानी बांदल यांचे वेळोवेळी मिळणारे मार्गदर्शन, पेरिविंकल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज च्या प्राचार्य सौ निर्मल पंडित यांचे अभ्यासपूर्ण व धडाडीचे नेतृत्व तसेच HOD सचिन खोडके यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न आणि इन्चार्जेस कल्याणी शेळके, पूनम पांढरे व नेहा माळवदे या सर्वांची जिद्द व चिकाटी यांचा मिलाप व सहकार्य आणि उच्च विद्या विभूषित आणि अनुभवी शिक्षकवृंद, तसेच या सर्व वातावरणात आपले १००% प्रयत्न देणारे विद्यार्थी या सर्वाच्या एकत्रित प्रयत्नानेच हे यश प्राप्त करू शकल्याची दिलखुलास शाबासकीची थाप संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री बांदल सरांनी सर्वांना दिली.

आजच्या या उत्तुंग यशाचे मानकरी असलेले विद्यार्थी आणि शिक्षक यांचा पुष्पगुछ व पेढे देऊन शाळेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राजेंद्र बांदल सर, संचालिका सौ रेखा बांदल , शिवानी बांदल आणि शाळेच्या प्राचार्या सौ निर्मल पंडित यांच्या हस्ते गौरव करण्यात आला आणि त्यांना त्यांच्या भावी उच्च शिक्षणासाठी व उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. online निकाल लागल्यावर लगेचच गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक साजरे करण्यासाठी शाळेचे संस्थापक अध्यक्ष जातीने उपस्थित राहिले.