बाणेर :
आज दि. ७ मे रोजी भारतीय सैन्याने पाकिस्तानमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतल्याच्या या बातमीने देशभरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या विजयाच्या जल्लोषात आज सायंकाळी बाणेर येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ भाजपा कोथरूड विधानसभा उत्तर मंडलाचे अध्यक्ष श्री. लहू अण्णा बालवडकर यांच्या नेतृत्वात व राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांतदादा पाटील, देशाचे राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ आणि भाजपा पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांच्या मार्गदर्शनाखाली आनंद उत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी मोठ्या संख्येने माजी नगरसेविका, नगरसेवक, कार्यकर्ते आणि पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. उपस्थितांनी फटाके, पेढे वाटून आणि ‘भारत माता की जय!’ तसेच भारतीय सैन्याच्या जयघोषाने परिसर दणाणून सोडला. भारतीय सैन्यदलाच्या या पराक्रमाचे आणि पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे अभिनंदन यावेळी करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना भाजपा कोथरूड विधानसभा उत्तर मंडलाचे अध्यक्ष लहू बालवडकर म्हणाले, “भारतीय सैन्याने आज जे शौर्य दाखवले आहे, ते अतुलनीय आहे. पहलगाम हल्ल्यातील आपल्या नागरिकांच्या बलिदानाचा बदला घेतल्याने प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने फुलली आहे. या पराक्रमासाठी मी भाजपा कोथरूड विधानसभा उत्तर मंडल च्या वतीने भारतीय सैन्यदल आणि पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.”



More Stories
पेरिविंकलचा ‘यशदीप’ पुन्हा तेजाने उजळला; SSC बोर्डात घवघवीत यशाची परंपरा कायम!
पेरीविंकलच्या सुस शाखेत इ.12वी नंतर 10वीत देखील १००% निकालाच्या इतिहासाची पुनरावृत्ती!! पेरीविंकल च्या अवंतिकाने मारली बाजी!!
पेरीविंकल शाळेच्या पौड शाखेच्या पहिल्याच दहावी बॅचचा शंभर टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचे घवघवीत यश!!!!