बालेवाडी :
आज बालेवाडी येथील कै.बाबुराव गेणुजी बालवडकर मनपा शाळेतील विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अमोल बालवडकर फाऊंडेशनच्या प्रयत्नातून आणि तिर्थ डेव्हलपर्स यांच्या सहकार्याने, विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी तसेच त्यांना संगणकीय प्रशिक्षण मिळावे यासाठी ५ लॅपटॉप आणि ३ कॉम्प्युटरचे वाटप करण्यात आले. हे वाटप नगरसेवक श्री. अमोल बालवडकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
याप्रसंगी बोलताना नगरसेवक बालवडकर म्हणाले की, “आजच्या युगात तंत्रज्ञानाचे महत्व अनमोल आहे. विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण मिळावे आणि ते डिजिटल युगात मागे राहू नयेत, यासाठी आमचा हा छोटासा प्रयत्न आहे. तिर्थ डेव्हलपर्स यांनी या कार्यात मोलाची मदत केली, त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.”
या कार्यक्रमाला शशिकांत बालवडकर, योगेश बालवडकर, प्रविण बालवडकर, नितेश पाडाळे, प्रसाद बालवडकर यांच्यासह शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कल्पना बाबर मॅडम, शोभा घोरपडे मॅडम, तनुश्री ताजणे मॅडम, अशोक वाघमारे सर आणि तिर्थ डेव्हलपर्सचे श्री. कमलेश चौधरी, अशोक टेहाळे व देव कुमार उपस्थित होते.
मुख्याध्यापिका सौ. कल्पना बाबर मॅडम यांनी अमोल बालवडकर फाऊंडेशन आणि तिर्थ डेव्हलपर्स यांचे आभार मानले आणि या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल, असे मत व्यक्त केले.
अमोल बालवडकर फाऊंडेशनच्या या स्तुत्य उपक्रमामुळे बालेवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना आता आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण घेणे अधिक सोपे होणार आहे.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी