May 20, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स च्या वतीने अण्णा माझीरे यांचा आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सन्मान!!!

भूकुम :

दैनिक पुढारी वृत्तपत्रच्या वतीने देण्यात येणारा मानाचा असा आदर्श सरपंच सन्मान पुरस्कार मुळशी तालुक्यातील भूकुम गावचे माजी सरपंच नामदेव अण्णा माजिरे यांना देण्यात आला.

 

२००९ साली पुणे जिल्ह्याचे पालक मंत्री माननीय अजित दादा पवार यांच्या हस्ते आदर्श सरपंच म्हणून पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. मुळशी तालुक्यातील एक दमदार व्यक्तिमत्व व सरपंच म्हणून अण्णांची ख्याती आहेच. त्यांनी भुकूम गावचा विकास घडवून गावाचा सर्व बाबतीत विकास करून कायापालट केला. त्यांच्या तालमीत कोविड काळातही स्वतःच्या जीवाची किंवा वयाची तमा न बाळगता त्यांनी पोलिस बांधवांना दररोज नाश्ता स्वतः जाऊन पुरवला व सामाजिक आणि राजकीय बांधिलकी जपत माणुसकीचे साक्षात दर्शन घडवले.

याआधीही नामदेव अण्णा यांना अनेक पुरस्कारांनी पुरस्कृत करण्यात आले होते व त्यातच काल पुन्हा एकदा आदर्श सरपंच पुरस्काराने प सन्मानित झाल्याने भूकुम गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवून गावाचा मान उंचावली आहे. नामदेव अण्णा हे मुळशी तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक म्हणून ओळखले जातात. पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ते ज्येष्ठ नागरिक संघटनेचे पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

त्यांच्या या कार्याला सलाम करत पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स च्या वतीने नामदेव अण्णा यांना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद माझीरे तसेच माजी तंटामुक्ती अध्यक्ष अनंतराव हगवणे उपस्थीत होते.