बाणेर :
बाणेर, येथे सौ. पूनम विशाल विधाते (कार्याध्यक्षा – पुणे शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) यांच्या पुढाकाराने आज बाणेर येथे आयोजित कार्यक्रमात पुण्याचे पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजितदादा अनंतराव पवार यांना सुस रोड बाणेर विकास मंचचे अध्यक्ष यांच्या हस्ते, “नोबल एक्स्चेंज, बाणेर गार्बेज प्लांट” बंद करणे व स्थलांतरित करणे या गंभीर प्रश्नासंदर्भातील निवेदन मा. अजितदादांना सौ. पूनम विधाते यांच्या उपस्थितीत सादर करण्यात आले.
यावेळी तात्काळ प्रतिसाद देत, मा. अजितदादांनी पुणे महानगरपालिका (PMC) आयुक्तांना स्पष्ट निर्देश दिले की प्लांट बंद करून तो स्थलांतरित करण्यासाठी तत्काळ जागेची निवड करावी आणि संपूर्ण प्रक्रिया त्वरित हाती घ्यावी.
सौ. पूनम विधाते यांनी सांगितले की, “नागरिकांच्या समस्या सोडविणे हे माझे प्रातिनिधिक कर्तव्य आहे. स्वच्छता, आरोग्य आणि पर्यावरण यांसारख्या मूलभूत प्रश्नांची दखल घेऊन उपाययोजना व्हाव्यात, हीच माझी भूमिका आहे. बाणेर आणि परिसरातील नागरिकांच्या हितासाठी माझा संघर्ष असाच सुरू राहील.”
हा निर्णय बाणेर परिसरातील नागरिकांच्या दीर्घकाळच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देणारा असून, स्थानिकांच्या आरोग्य व पर्यावरणासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.



More Stories
बालेवाडीत कचरा समस्येवर मोरेश्वर बालवडकर यांचे सहाय्यक आयुक्तांना निवेदन; १५ दिवसांत उपाय न झाल्यास आंदोलनाचा इशारा
नसरापूर येथील चिमुरडीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीचा मेणबत्ती मोर्चा
गायनातून भाव व्यक्त होणे अत्यावश्यक : पं. उपेंद्र भट सोमेश्वर फाउंडेशनतर्फे २४ व्या ‘पुणे आयडॉल- 2026’ स्पर्धेचे उद्घाटन