February 4, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

पाषाण-सुतारवाडी मध्ये कॅबिनेट मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या नव्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन..

पाषाण :

नागरी समस्या सोडविण्यासाठी जनसंपर्क कार्यालय हे हक्काचे केंद्र असून, कोथरुड मतदारसंघातील संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांचे विविध समस्या सोडविण्यासोबतच; शासनाच्या लोकोपयोगी योजनांचा लाभ पोहोचवण्याची भावना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली. कोथरुड मतदारसंघातील पाषाण-सुतारवाडी भागातील नागरिकांसाठी नवीन जनसंपर्क कार्यालयाचे लोकार्पण ना. पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी भाजप उत्तर मंडल अध्यक्ष लहू बालवडकर, पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, पुणे शहर सरचिटणीस गणेश कळमकर, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश सरचिटणीस प्रल्हाद सायकर, माजी नगरसेवक सनी निम्हण, किरण दगडे, दिलीप वेडे पाटील, दिपक पोटे, जयंत भावे, माजी नगरसेविका ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, अपर्णा वर्पे, हर्षली माथवड, मयुरी कोकाटे, प्रकाश तात्या बालवडकर, नवनाथ जाधव, उत्तरचे माजी अध्यक्ष सचिन पाषाणकर, रतन आप्पा बालवडकर, नितीन कोकाटे, दक्षिणचे माजी अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, विठ्ठल बराटे, कुलदीप सावळेकर, बाळासाहेब टेमकर, सचिन दळवी, राहूल कोकाटे, शिवम सुतार, शिवम बालवडकर, मोरेश्वर बालवडकर, शरद भोते, सुभाष भोळ, सचिन सुतार, विवेक मेथा, उमा गाडगीळ, अस्मिता करंदीकर, मीना पारगावकर, वंदना सिंग, स्नेहल चौगुले, जागृती विचारे, हर्षदा थिटे, मृणाल गायकवाड, प्राजक्ता देवस्थळी, सोनाली सुतार, विजया चांदूरकर, रीना रायकर, उज्वला साबळे, रेखा कश्यप, सुरेखा वाबळे, रजनी शिरसाट, डॉ. प्रियंका पेंडसे, राजेश राठोड, अनिकेत चांदेरे, डॉ. आनंद जराड, सुशील सरकटे, प्रदीप ओझा, सविता जाधव, विवेक धोडे यांच्या सह भाजपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी जेष्ट नेते भगवान तात्या निम्हण यांनी जनसंपर्क कार्यालयास जागा उपलब्ध करून दिली त्याबद्दल चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

ना. पाटील म्हणाले की, नागरी समस्या सोडविण्यासाठी जनसंपर्क कार्यालय हे हक्काचे केंद्र आहे. मतदारसंघातील विविध जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासोबतच; शासनाच्या विविध लोकोपयोगी योजना जनतेपर्यंत पोहोचविल्या. त्यामुळे या जनसंपर्क कार्यालयाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते सुकन्या समृद्धी योजनेच्या लाभार्थ्यांना योजनेचे कार्ड प्रदान करण्यात आले.