बालेवाडी :
बाणेर-बालेवाडी-सुस-म्हाळुंगे-पाषाण-औंध परिसरातील नागरिकांसाठी मा. नगरसेवक अमोलभैय्या बालवडकर यांच्या माध्यमातून ‘मतदार नोंदणी अभियान’ राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत, बालेवाडी येथील लाविदा सोसायटीमध्ये नवीन मतदार नोंदणी आणि मतदार यादीतील नाव, पत्ता व फोटो दुरुस्तीसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या अभियानाला लाविदा सोसायटीतील नवीन सदनिकाधारक आणि परिसरातील इतर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अनेक नागरिकांनी या संधीचा लाभ घेत आपली मतदार नोंदणी केली तसेच यादीतील त्रुटी दुरुस्त करून घेतल्या.
या उपक्रमाबद्दल बोलताना मा. नगरसेवक अमोलभैय्या बालवडकर म्हणाले की, “आमचा उद्देश हा जास्तीत जास्त नागरिकांना मतदार म्हणून नोंदणी करता यावी आणि कोणालाही मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागू नये हा आहे. नागरिकांचा मिळणारा प्रतिसाद उत्साहवर्धक आहे.”
ज्या नागरिकांना अजूनही नवीन मतदार नोंदणी करायची आहे किंवा मतदार यादीत काही दुरुस्ती करायची आहे, ते नगरसेवक अमोलभैय्या बालवडकर यांच्या जनसंपर्क कार्यालयामार्फत संपर्क साधून आपली नोंदणी करू शकतात, असे आवाहनही करण्यात आले आहे.



More Stories
*संगीताच्या सुरेल मैफलीने रसिक मंत्रमुग्ध; दिवाळी बोनस वितरणातून शिक्षकांच्या योगदानाचा सन्मान, पेरीविंकल परिवारात उत्साह आणि स्नेहाचा जागर!*
*औंध-बोपोडी परिसरात पाच ठिकाणी सार्वजनिक वसुबारस पूजनाचे आयोजन, नगरसेवक सनी विनायक निम्हण यांचे नागरिकांना कुटुंबासह सहभागी होण्याचे आवाहन*
बाणेरच्या ‘रेजेन्सी अस्ट्रा’ प्रकल्पाला स्टॉपवर्क! सर्व्हे नं. ५४ मधील रोहन लेहेर लेआउटच्या अॅमेनिटी स्पेस गैरव्यवहार प्रकरणी महापालिकेची कारवाई*