May 28, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बालेवाडी येथे मनोज बालवडकर युथ फाउंडेशन आयोजित “होम मिनिस्टर : खेळ रंगला पैठणीचा” या विशेष कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

बालेवाडी :

मनोज बालवडकर युथ फाउंडेशन आयोजित “होम मिनिस्टर : खेळ रंगला पैठणीचा” या विशेष कार्यक्रमाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद शब्दांत मांडणं कठीण आहे. स्त्रीशक्तीचा उत्सव, सांस्कृतिक खेळांची धमाल, आणि हसऱ्या चेहऱ्यांनी भरलेलं वातावरण हा एक अविस्मरणीय सोहळा ठरला! यावेळी सौ. नीता त्रंबक ढासाळकर यांनी प्रथम क्रमांक प्राप्त करत ज्युपिटर गाडी, पैठणी साडी व सन्मानचिन्ह मिळविले.

 

मराठी अभिनेत्री साक्षी गांधी, राष्ट्रवादी युवती काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष व कारेगाव ग्रामपंचायत सरपंच निर्मलाताई शुभम नवले यांच्या विशेष उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा आणखी वाढवली.

या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभली ती भोर – राजगड – मुळशी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. श्री. शंकरभाऊ मांडेकर तसेच श्री. बाबुराव आप्पा चांदेरे (माजी नगरसेवक व स्थायी समिती अध्यक्ष, पुणे मनपा), श्री. राहुलदादा बालवडकर (उपाध्यक्ष – पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस), श्री. समीर बाबुराव चांदेरे (अध्यक्ष – राष्ट्रवादी युवक काँग्रेस, पुणे शहर), सौ. सरलाआक्का बाबुराव चांदेरे, डॉ. सागर बालवडकर, शिवम बालवडकर, सौ.अक्षता विधाते, ज्योती बालवडकर, रुपाली बालवडकर, सायली शिंदे, कोमल तांबे, स्वाती बालवडकर, राखी श्रीराव आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच सर्व राष्ट्रवादी काँग्रेस युवती व महिला पदाधिकारी, समस्त बालेवाडी ग्रामस्थ, पाहुणे मंडळी व सर्व मित्र परिवार उपस्थित होते.

या प्रसंगी भोर-राजगड-मुळशी विधानसभा मतदारसंघातून प्रचंड बहुमतांनी विजयी झाल्याबद्दल मा. श्री. शंकरभाऊ मांडेकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

स्पर्धेतील विजेत्या महिला भगिनींचे मनःपूर्वक अभिनंदन :

१ ले बक्षीस – सौ. नीता त्रंबक ढासाळकर – ज्युपिटर गाडी, पैठणी साडी व सन्मानचिन्ह

२ रे बक्षीस – सौ. पूजा प्रमोद गरड – फ्रीज, पैठणी साडी आणि सन्मानचिन्ह

३ रे बक्षीस – सौ. सविता नंदलाल जगदाळे – LED TV, पैठणी साडी व सन्मानचिन्ह

४ थे बक्षीस – सौ. रोहिणी इंद्रजित गरड – मायक्रोवेव्ह ओव्हन, पैठणी साडी आणि सन्मानचिन्ह

५ वे बक्षीस – सौ. अर्चना लखन चव्हाण – मिक्सर, पैठणी व सन्मानचिन्ह

लकी ड्रॉ विजेते :

१ ले बक्षीस – सौ. प्रीती रमेश गावडे – वॉशिंग मशीन व सन्मानचिन्ह

२ रे बक्षीस –सौ. सरिता प्रकाश केणे – वॉटर प्युरिफायर व सन्मानचिन्ह

३ रे बक्षीस –सौ. सोनाली मसलखांब – मिक्सर व सन्मानचिन्ह

४ थे बक्षीस –सौ. आश्विनी ईश्वर कांबळे – फॅन व सन्मानचिन्ह

५ वे बक्षीस –सौ. सविता भांडे – इस्त्री व सन्मानचिन्ह

या सोहळ्याला उपस्थित राहिलेल्या माझ्या सर्व महिला भगिनींचं मन:पूर्वक आभार.

तुमच्या प्रेमळ सहभागामुळे ‘खेळ रंगला पैठणीचा’ हा कार्यक्रम सन्मान, संस्कृती आणि एकतेचा एक सुंदर सोहळा ठरला.