महाळुंगे :
आज महाळुंगे येथील पुणे महानगरपालिका शाळा सभागृहात, सौ. पूनम विशाल विधाते (कार्याध्यक्षा, पुणे शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) यांच्या पुढाकाराने महाळुंगे व सुस परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी “जनता दरबार” आयोजित करण्यात आला. भोर-राजगड-मुळशी विधानसभेचे आमदार मा. श्री. शंकरभाऊ मांडेकर साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी आमदार शंकर भाऊ मांडेकर यांनी प्रत्येक नागरिकाचे म्हणणे काळजीपूर्वक ऐकून घेतले आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी तातडीने योग्य उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. “आपली समस्या, आपले मत, आपल्या भागाचा विकास” या ध्येयाने आपण काम करत असून, नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत, असे त्यांनी सांगितले.
या जनता दरबारात परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून पाणी, रस्ते, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन आणि सार्वजनिक सुविधांसारख्या अनेक महत्त्वाच्या समस्या मांडल्या. आमदार मांडेकर यांनी नागरिकांच्या समस्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.



More Stories
*औंध-बोपोडी परिसरात पाच ठिकाणी सार्वजनिक वसुबारस पूजनाचे आयोजन, नगरसेवक सनी विनायक निम्हण यांचे नागरिकांना कुटुंबासह सहभागी होण्याचे आवाहन*
बाणेरच्या ‘रेजेन्सी अस्ट्रा’ प्रकल्पाला स्टॉपवर्क! सर्व्हे नं. ५४ मधील रोहन लेहेर लेआउटच्या अॅमेनिटी स्पेस गैरव्यवहार प्रकरणी महापालिकेची कारवाई*
*प्रसिद्ध डायरेक्ट सेलिंग कंपनी ‘प्रोव्हेदा इंडिया’चा ७ वा वर्धापन दिन पुण्यात दणक्यात संपन्न!*