बालेवाडी :
बालेवाडी वेल्फेअर फेडरेशनने (Balewadi Welfare Federation) ‘हरित बालेवाडी’ (Harit Balewadi) हे उद्दिष्ट समोर ठेवून २०२१ पासून दरवर्षी पावसाळ्यात वृक्षारोपण मोहीम राबवली आहे. पुणे महापालिकेच्या उद्यान विभागाच्या सहकार्याने फेडरेशनने आतापर्यंत १२०० हून अधिक झाडे लावली असून, त्यापैकी जवळपास ८५० ते ९०० झाडे जगली आहेत. मैदाने, रस्त्यांच्या कडेला आणि उपलब्ध मोकळ्या जागांमध्ये झाडे लावून बालेवाडीला पुन्हा हिरवेगार करण्याचा हा प्रयत्न सुरू आहे.
जून २०२५ मध्ये पलक मार्ग परिसरात ५० झाडे लावून यावर्षीच्या वृक्षारोपण कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर, १० ऑगस्ट रोजी दसरा चौक ते लक्ष्मी माता मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरही ५० झाडे लावण्यात आली. या कार्यक्रमात फेडरेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मोरेश्वर बालवडकर, आशिष कोटमकर, दफेदार सिंह, ॲड. इंद्रजित कुलकर्णी, राजीव शहा, वैभव आढाव, अशोक नवाल, रमेश रोकडे, ॲड. माशाळकर, वंदना चौधरी, सुनील होवाळे, ललित पवार, डॉ. अजित धात्रक, गिरीश ढोबे, ओमप्रकाश वानखेडे आणि शकील सलाटी यांनी विशेष मेहनत घेतली.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी