May 3, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

सोमेश्वरवाडी साईनगर येथील रस्त्यावरील चोकअप झालेले चेंबर सचिन दळवी यांच्या प्रयत्नातून दुरुस्त..

सोमेश्वरवाडी :

सोमेश्वरवाडी साईनगर येथील अंतर्गत रस्त्यावरील चेंबर लाईन चोकअप झाल्यामुळे दूषित पाणी रस्त्यावर आल्याने नागरिकांना त्रास होत होता. हे समजल्यावर तत्काळ भाजपा कोथरूड विधानसभा उपाध्यक्ष सचिन दळवी यांनी औंध क्षेत्रीय कार्यालयातील संबंधित अधिकारी यांच्याशी संपर्क साधा सदर चेंबर लाईन दुरुस्त करून घेतली.

 

सोमेश्वरवाडी साईनगर येथे काही दिवसांपासून अंतर्गत गटर लाईनचे चेंबर चोकअप झाल्यामुळे त्यातून प्रचंड प्रमाणात दूषित पाणी संपूर्ण रस्त्यावर वाहत होते. त्यामुळे प्रचंड दुर्गंधी पसरून आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास होत होता. पावसाळ्याचे दिवस आणि आरोग्याच्या दृष्टीने सदर दुर्गंधी घातक असल्यामुळे नागरिकांच्या तक्रारीनुसार त्वरित दखल घेत औंध क्षेत्रीय कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधत हे चेंबर दुरुस्त करून घेतले. औंध क्षेत्रीय कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांनी आम्ही केलेल्या तक्रारीची दखल घेत त्वरित ते चेंबर दुरुस्त करून दिले, त्याबद्दल नागरिकांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो – सचिन दळवी (उपाध्यक्ष भाजपा कोथरुड विधानसभा)