May 14, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

सुतारवाडी येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस वृक्षरोप आणि पेढे वाटून साजरा..

सुतारवाडी :

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना(ऊ.ठ.बा.) पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस महेश भीमराव सुतार यांच्या वतीने शिवसेना शाखा सुतारवाडी येथे वृक्षरोप वाटप व पेढे वाटप करून साजरा करण्यात आला.

 

वाढदिवस नैतिक सृजनशील पर्यावरण प्रेमी नेत्याचा म्हणजे आमचे मार्गदर्शक महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस पर्यावरण राखता यावे याकरिता वृक्षरोप वाटप करून त्यांना दीर्घायुष्य लाभावे अशा सदिच्छा व्यक्त केल्या – महेश भिमराव सुतार

यावेळी प्रमुख उपस्थिती चंद्रकांत आप्पा बराटे(शिवदूत), दिलीप काका जानोरकर(शिवदूत), संतोष तोंडे(विभागप्रमुख), स्वाती रणपिसे (विभागसंघटिका), दिनेश नाथ (उप विभागप्रमुख), ऋषिकेश कुलकर्णी, छाया पाडाळे (उप विभागसंघटिका), सुनिता रानवडे (शाखा संघटिका), सुनील ढोरे (मनपा सुरक्षा रक्षक), अनिल नलावडे, करण कांबळे, रुपाली सुतार, मनीष चक्रनारायण, नकुल गोळे, गणेश मोरे, अमोल फाले, साहिल सुतार (अध्यक्ष स्वराज्य प्रतिष्ठान), जीवन सुर्वे, कुलदीप सुतार, शिवम सुतार, आदेश सुतार यावेळी पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व युवा कार्यकर्ते उपस्थित होते.