May 7, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

माजी नगरसेविका ज्योती गणेश कळमकर यांच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा दिवस म्हणून कर्णबधिर मुलांना फळे व अल्पोपहार वाटप..

पाषाण :

“स्वरनाद” कर्णबधिर बालकांचे बहुआयामी अपंग पुनर्वसन सर्वांगीण विकास केंद्र व माजी नगरसेविका ज्योती गणेश कळमकर यांच्या प्रयत्नातून पाषाण टेकडी येथे कर्णबधिर मुलांची सहल आयोजित करण्यात आली. यात संस्थेचे एकूण 52 विद्यार्थी सहभागी झाले.

 

या संस्थेमार्फत सर्व विद्यार्थ्यांना नगरसेविका ज्योती गणेश कळमकर व भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष गणेश ज्ञानोबा कळमकर यांच्या कडून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सर्व कर्णबधिर मुलांना फ्रुटी, फळे व अल्पोपहार वाटप करण्यात आले.

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस ‘सेवा दिवस’ म्हणून साजरा व्हावा म्हणून कर्णबधिर मुलांना फ्रुटी, फळे व अल्पोपहार वाटप करण्यात आला – गणेश कळमकर (भाजपा उपाध्यक्ष पुणे शहर)

यावेळी संस्थेच्या सौ रक्षाताई देशपांडे, विनय देशपांडे व शिक्षक वर्ग आणि नवचैतन्य ज्येष्ठ नागरिक हास्य क्लब, पाषाण यांचे सदस्य उपस्थित होते.