May 2, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बालेवाडीतील सार्वजनिक स्वछतागृहांचा प्रश्न सोडवण्याची बालेवाडी वेल्फेअर फेडरेशन ची मागणी.

बालेवाडी :

बालेवाडी वेल्फेअर फेडरेशन च्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच पुणे महानगरपालिकेच्या उपायुक्त (घनकचरा विभाग) श्रीमती अशा राऊत यांची भेट घेऊन चर्चा केली. बंद असलेली दोन्ही स्वछतागृह त्वरित सुरु करावी अशी मागणी केली, तसेच बालवाडीतील लोकसंख्येचा अभ्यास करून नियमानुसार किती सार्वजनिक स्वच्छतागृह असणे आवश्यक आहे याचा सर्व्हे करून नवीन स्वच्छतागृह बांधावीत अशी मागणी केली.

 

बालेवाडीची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून त्या प्रमाणात आवश्यक सुविधा मिळण्यामध्ये गती दिसून येत नाही त्यामुळे लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. अशीच एक महत्वाची समस्या म्हणजे सार्वजनिक स्वछता गृह. सध्या बालेवाडी हाय स्ट्रीट च्या समोर असणाऱ्या सुसज्ज स्वच्छता गृहाचा उपयोग करण्यासाठी नागरिकांना थेतील रखवालदाराच्या उपलब्धतेनुसार करावा लागतो अनेक वेळा हे स्वच्छतागृह बंद असते. तसेच दुसरे स्वछतागृह हे साई चौकातील फुटपाथ वरती आहे. ते तर गेली अनेक वर्ष वापराविना बंद आहे. स्वछ्तेगृहांचा अभाव असल्याने अनेक वेळा मोकळ्या जागांचा स्वछतागृहांसारखा उपयोग केला जातो.

ही परिस्थिती लक्षात घेऊन बालेवाडी वेल्फेअर फेडरेशन च्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच पुणे महानगरपालिकेच्या उपायुक्त (घनकचरा विभाग) श्रीमती अशा राऊत यांची भेट घेऊन चर्चा केली. बंद असलेली दोन्ही स्वछतागृह त्वरित सुरु करावी अशी मागणी केली, तसेच बालवाडीतील लोकसंख्येचा अभ्यास करून नियमानुसार किती सार्वजनिक स्वच्छतागृह असणे आवश्यक आहे याचा सर्व्हे करून नवीन स्वच्छतागृह बांधावीत अशी मागणी केली.

श्रीमती राऊत यांनी या संदर्भात औंध क्षेत्रीय कार्यालयातील सहाय्य्क आयुक्तांशी दूरध्वनी वरून संपर्क करत बंद असलेली स्वछतागृह त्वरित सुरु करण्याचे आदेश दिले. तसेच नवीन स्वछतागृहांच्या निर्मितीसाठी योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. फेडरेशन चे परशुराम तारे, अमेय जगताप, डॉ. सुधीर निखारे आणि एस. ओ. माशाळकर या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली व निवेदन दिले.

You may have missed