June 18, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

चंद्रकांत पाटील यांच्या वतीने अहिल्या महिला बचत गटांची उपस्थितीमध्ये गोरगरिबांना शालेय साहित्य वाटप

बाणेर        

पुणे प्रभागातील बाणेर गावात चंद्रकांत पाटील यांनी शालेय साहित्य वाटपाचे कार्यक्रम आयोजन केले होते.यामध्ये पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी अहिल्या महिला बचत गटांनी सहभाग घेतला होता.        

 

सोमवारी बाणेर गावातील गोरगरीब मुलांना शालेय दफ्तरासह आदी साहित्य देण्याचे कार्यक्रम चंद्रकांत पाटील यांच्या संपर्क कार्यालयात आयोजन केले होते. या ठिकाणाहून साहित्य वाटप केले.            

यावेळी अहिल्या महिला बचत गटांचे अध्यक्षा साजना दिलीप भुजबळ यांनी काही पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना घेऊन चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयातून लाभ मिळवून दिला. यामध्ये 50 पेक्षा जास्त विद्यार्थ्याना साहित्य देण्यात आले.          

या प्रसंगी अहिल्या महिला बचत गटाचे अध्यक्षा साजना भुजबळ, कार्यालयीन प्रमुख विपुल खोडवे,बाळा नागरगोजे,अभिजीत पाषाणकरअमोल घोडके आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.