सोमेश्वरवाडी :
सोमेश्वरवाडी, पाषाण, सुतारवाडी, बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे या परिसरातील नागरिकांसाठी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन दळवी सोशल फाऊंडेशन तर्फे घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धा २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेसाठी दि. २९ ऑगस्ट २०२५ पर्यंत नावनोंदणी करणे आवश्यक आहे. इच्छुक स्पर्धकांनी आपले पूर्ण नाव, पत्ता व संपर्क क्रमांक खाली दिलेल्या क्रमांकावर पाठवावेत.
📞 संपर्क : 7028381352 / 8830397638
आयोजक मंडळाचे प्रतिनिधी स्पर्धकांच्या घरी भेट देऊन सजावटीची पाहणी करतील.
🏆 स्पर्धेचा निकाल दि. १० सप्टेंबर २०२५ रोजी सायं. ६ वा. ज्ञानदिप मंगल कार्यालय, पाषाण येथे जाहीर करण्यात येईल.
स्पर्धेत विजेत्यांना LED टीव्ही, मोबाईल, वॉटर प्युरिफायर, गॅस शेगडी, कूलर, होम थिएटर, मिक्सर, कुकर, डिनर सेट, ज्यूसर अशा आकर्षक बक्षिसांनी गौरविण्यात येणार आहे. याशिवाय प्रत्येक सहभागी स्पर्धकाला आकर्षक भेटवस्तू दिली जाणार आहे.
👉 गणेशोत्सवाच्या आनंदात भर घालणाऱ्या या स्पर्धेत नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक सचिन चितामण दळवी (सरचिटणीस, भाजप कोथरूड विधानसभा उत्तर मंडल) यांनी केले आहे.


More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!