पिरंगुट :
मुळशी तालुका कराटे स्पर्धेत पेरीविंकल इंग्लिश मिडीयम स्कूल, पिरंगुट येथील विद्यार्थ्यांनी आपल्या दमदार कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
🥇 अंडर 14 मुले गटात *वेदांत मते* याने प्रथम क्रमांक पटकावला.
🥇 अंडर 19 मुले गटात *सार्थक राऊत* याने देखील प्रथम क्रमांक मिळवून शाळेचा झेंडा उंचावला.
🥈 अंडर 19 मुली गटात *अनुष्का येवले* हिने द्वितीय क्रमांक मिळवून आपली चमक दाखवली.
दिनांक २५ ऑगस्ट २०२५ रोजी माण येथे पार पडलेल्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी केलेल्या यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष श्री. राजेंद्र बांदल , संचालिका सौ. रेखा बांदल, संचालिका कु. शिवानी बांदल, प्राचार्या सौ. असावरी हंचाटे मॅडम तसेच मार्गदर्शक प्रविण मोरे सर, क्रिडा प्रशिक्षक हनुमंत मणेरे यांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांच्या या चमकदार यशामुळे शाळेची मान उंचावली असून, पालक व शिक्षकवर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे.



More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!