February 4, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

सूस शाखेतील पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे “शाडू मातीपासून गणपती घडवणे” या विशेष कार्यशाळेचे आयोजन!!!!

सूस :

चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरीविंकल इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथील सूस शाखेमध्ये आज सोमवार दिनांक २५ऑगस्ट २०२५ रोजी गणेशोत्सवाचे औचित्य साधून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी शाडू मातीपासून गणपती घडवण्याची विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता वाढवणे आणि पर्यावरणाच्या रक्षणाविषयी जागरूकता निर्माण करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
श्री भगवती सेवा आश्रम बाणेर संचालित जीवन कौशल्य विकास यांच्यामार्फत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये भगवती डॉक्टर श्याम कुलकर्णी, गिरीधर राठी, प्रकाशजी बोकील, नारायणजी चांदेरे , विठ्ठल सुतार डॉ. गजानन राजपूत या गणपती मूर्तींचे निरीक्षण केले व विद्यार्थ्यांना उत्तेजन म्हणून ५ बक्षिसे जाहीर केली. याकरिता नारायणजी चांदीरे यांनी विशेष पाठिंबा दिला विशेष पाठिंबा दिला श्री विठ्ठल सुतार यांनी विद्यार्थ्यांना गणपतीची मूर्ती घडवण्यासाठी 40 किलो शाडू माती देण्यात आली

या कार्यशाळेत शाळेतील इयत्ता ६वी ते १२वी तसेच कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. शाडू माती म्हणजे नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक माती. प्लास्टर ऑफ पॅरिस (POP) च्या मूर्तींपेक्षा शाडू मातीच्या मूर्ती पाण्यात सहज विरघळतात व जलप्रदूषण टाळतात, याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.

कार्यशाळा शाळेच्या कला विभागाच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेचा वापर करून विविध प्रकारच्या, सुंदर आणि आकर्षक गणपती मूर्ती साकारल्या. कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणजे प्रशालेच्या मुख्याध्यापिका निर्मल पंडित तसेच कनिष्ठ महाविद्यालय विभागप्रमुख श्री. सचिन खोडके आणि कलाशिक्षक शिवराज कदम यांनी मूर्ती घडवताना प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन केले.

“आजच्या पिढीने फक्त सण साजरे करणे नाही, तर ते पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे करणे महत्त्वाचे आहे. ही कार्यशाळा म्हणजे एक पाऊल नैसर्गिकतेकडे.”

कार्यशाळेचा शेवटी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या मूर्तींचे लघुपरिषद स्वरूपात प्रदर्शनही भरवण्यात आले, ज्याला पालक व शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या कार्यशाळा दिनाचे संपूर्ण आयोजन कायम पाठिंबा असणारे शाळेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राजेंद्र बांदल सर, संचालिका सौ रेखा बांदल व शिवानी बांदल तसेच मुख्याध्यापिका यांच्या अध्यक्षतेखाली आणि पेरिविंकल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज च्या सुस शाखेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित यांचे अभ्यासपूर्ण नेतृत्व तसेच HOD सचिन खोडके, पर्यवेक्षिका नेहा माळवदे , स्मिता श्रीवास्तव कला शिक्षक शिवराज कदम तसेच सर्व विषयशिक्षक या सर्वांची जिद्द व चिकाटी यांचा मिलाप व सहकार्य आणि उच्च विद्या विभूषित आणि अनुभवी शिक्षकवृंद यांचा परिपूर्ण सहभाग आजच्या या कार्यशाळेत दिसून आला.

हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणप्रेम, सर्जनशीलता आणि जबाबदारीची जाणीव निर्माण करणारा ठरला.