बालेवाडी :
बाणेर, बालेवाडी, पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, सुस व म्हाळुंगे परिसरातील नागरिकांसाठी शिवम बालवडकर (उपाध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा, पुणे शहर) आणि सौ. प्रियंका शिवम बालवडकर (सदस्य, भारतीय जनता पार्टी) यांच्या वतीने ‘गौरी-गणपती सजावट स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेत नागरिकांना आपली कला आणि सर्जनशीलता प्रदर्शित करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार असून, आकर्षक व पारंपरिक सजावटीसाठी विजेत्यांना विशेष बक्षिसे देण्यात येणार आहेत.
नागरिकांना नोंदणीसाठी Google Form उपलब्ध करून देण्यात आला असून, इच्छुकांनी खालील लिंकवर जाऊन नावनोंदणी करता येईल :
👉 https://forms.gle/rZZDX76vkyxFkoAt8
अधिक माहितीसाठी संपर्क : 📞 9922290202
सणासुदीच्या या उत्सवात पारंपरिक सजावट व आधुनिक कलात्मकतेचा संगम अनुभवण्यासाठी ही स्पर्धा परिसरातील नागरिकांसाठी एक विशेष व्यासपीठ ठरणार आहे.


More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी