बाणेर :
मराठा आरक्षणासह नऊ मागण्यांसाठी येत्या २९ ऑगस्टपासून मुंबईत मराठा समाजाचे आंदोलन सुरू होत आहे. या आंदोलनासाठी २७ ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील अंतरवली येथून मुंबईकडे प्रस्थान करणार आहेत. या पार्श्वभूमीवर बाणेर येथील कुंदन गार्डन येथे बाणेर, बालेवाडी, औंध, सुस, महाळुंगे, पाषाण, सुतारवाडी व सोमेश्वरवाडी भागातील मराठा समाजाची नियोजन बैठक पार पडली.
बैठकीत आंदोलनासाठी जाणाऱ्या नागरिकांच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था, प्रवासाची सोय आणि अन्य महत्वाच्या तयारीवर सविस्तर चर्चा झाली. यावेळी आंदोलनासाठी आवश्यक असलेली रसद पुण्यातून पुरवली जाणार असल्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.
मराठा समाजाच्या मागण्यांसाठी होणाऱ्या या ऐतिहासिक आंदोलनात पुण्यातून मोठ्या प्रमाणावर सहभाग होणार असल्याचे या बैठकीत ठळकपणे अधोरेखित करण्यात आले.


More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!