बाणेर, पुणे (दि. 23 ऑगस्ट 2025) –
अमर बिझनेस झोन टेस्ट्सवर माजी नगरसेविका ज्योती गणेश कळमकर आणि भाजपा नेते गणेश कळमकर यांच्या वतीने आयोजित “इको-फ्रेंडली गणेश मूर्ती कार्यशाळा” भक्तिभाव व उत्साहात यशस्वीरीत्या संपन्न झाली.
पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी लहानग्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. मातीतून स्वतःच्या हातांनी बाप्पाची मूर्ती घडवताना सहभागींमध्ये अपार आनंद व श्रद्धेचे भाव दिसून आले.
सकाळपासून सुरू झालेल्या या कार्यक्रमात गणेशस्तुतीपर गाणी, आरती आणि आकर्षक भेटवस्तूंचे वितरण अशा उपक्रमांनी कार्यशाळेला अधिक रंगत आणली. मुलांना या माध्यमातून पर्यावरण संवर्धन, मातीचे महत्त्व आणि स्वनिर्मितीचा आनंद अनुभवता आला. पुढील पिढीला हरित व प्रदूषणमुक्त गणेशोत्सवाचा संदेश मिळणे हा या उपक्रमाचा मोठा यश ठरला.
या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन करण्यासाठी डफळ सर, डॉ. राजेश देशपांडे, मा. डॉ. प्रिया देशपांडे उपस्थित होते. तसेच भाजपा नेते व मान्यवरांमध्ये श्री. सचिन पाषाणकर, उमाताई गाडगीळ, अस्मिताताई करंदीकर, कल्याणीताई टोकेकर, वैदेहीताई बापट, रेखा कश्यप, भाग्यश्री काटकर, शरदतात्या भोते, अभय बागल, चंद्रकांत जाधव, स्मृती जैन, निकिता माथाडे, निलेश सायकर, संदीप वाडकर, सचिन दळवी, मोसमी बकोरे, उज्वला साबळे, जागृती विचारे, अर्चना देशपांडे, स्नेहलताई चौगुले, प्राजक्ता देवस्थळी, मीनाताई पारगावकर, स्नेहल सुतार, विजया चांदोरकर आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल व पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प दृढ केल्याबद्दल सर्व मान्यवर, पालक, नागरिक व लहानग्यांचे आयोजकांनी मनःपूर्वक आभार मानले.



More Stories
पुणे आयडॉल २०२६ ची महाअंतिम फेरी १० मे रोजी बालगंधर्व येथे – ५६० स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग; विविध क्षेत्रातील मान्यवरांना ‘व्हॉइस ऑफ चॉईस’ विशेष पुरस्कार प्रदान करण्यात येणार
राजभवन (लोकभवन) मार्ग विस्तारीकरणाला गती; कामाचा शुभारंभ, वाहतूक कोंडीवर लवकरच दिलासा – नगरसेवक सनी निम्हण यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश
बालेवाडीत कचरा समस्येवर मोरेश्वर बालवडकर यांचे सहाय्यक आयुक्तांना निवेदन; १५ दिवसांत उपाय न झाल्यास आंदोलनाचा इशारा